इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील नाट्यपूर्ण रिऍलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. म्हणूनच सध्या त्याचे १६ वे पर्व सुरू आहे. राडा, ड्रामा, मनोरंजन यांनी रेलचेल असलेला ‘बिग बॉस’ हा शो आता दिवसेंदिवस अधिकाधिक रोमांचक होतो आहे. घरातील भांडणे आता हायव्होल्टेज होत आहेत. मध्यंतरी शिव आणि अर्चना यांच्यात वाद झाले होते. यात अर्चनाने थेट शिवचा गळा पकडला होता. त्यात अर्चनाची नखं शिवच्या गळ्याला लागली. तरी त्याने समंजसपणे प्रकरण हाताळलं. यावरून पुन्हा घरात राडे होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण झाल्याचं कळतंय. यावेळी हे भांडण घरातल्या शांत सदस्यांपैकी एक असलेल्या रॅपर एमसी स्टॅन आणि शालीन भानोत या दोघांमध्ये झालं आहे.
शालिन भानोत आणि एमसी स्टॅन यांच्यात जोरदार भांडण झालं आणि त्यानंतर एमसी शालीनला मारण्यासाठी फुलदाणी घेऊन त्याच्या मागे धावल्याचं कळतंय. टीनाच्या पायाला दुखापत झाली होती आणि शालिन मालिश करून देत होता, पण एमसीने शालिनला रोखलं. यानंतर शालिनने एमसीला मध्ये न बोलण्यास सांगितलं. त्यावरून एमसी आणि शालिनमध्ये जोरदार भांडण झालं आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं. ‘कलर्स टीव्ही’ने या भांडणाचा एक प्रोमो शेअर केला आहे. तसेच शोबद्दल अपडेट देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ नावाच्या ट्विटर हँडलवरून या भांडणाची माहिती देण्यात आली आहे.
https://twitter.com/BiggBoss_Tak/status/1593168343401639936?s=20&t=7wsB-1YIL5cBrYHreGOkYA
‘टीना घसरून पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. शालीन तिची काळजी घेत होता आणि तिच्या पायाला मालिश करत होता. याचदरम्यान टीना किंचाळली, त्यामुळे एमसी स्टॅनने शालीनला तिच्या पायाची मालिश करू नकोस, असं सांगितलं. तरीही शालिन मालिश करत होता. त्यानंतर स्टॅनने शालिनला शिवीगाळ केली. पुढे शालिनने स्टॅनच्या आईबद्दल अपशब्द वापरले, त्यामुळे चिडलेला स्टॅन फुलदाणी घेऊन शालिनला मारायला धावला. घरातील इतर स्पर्धक शिव ठाकरे, साजिद खान, निमृत कौर अहलुवालिया आणि सुंबूल तौकीर खान यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली, असं समोर आलंय. दरम्यान, ‘विकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खान या भांडणावर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Bib Boss Reality Show Fight Video Viral