विवेक वाणी, नाशिक
प्रबोधन संस्थेच्या सोशल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष भूषण सोंजे यांना ग्लोबल फाऊंडेशनच्या समाज भूषण (सामाजिक कार्य) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेले पद्मश्री पोपटराव पवार (आदर्श गाव हिवरे बाजार चे जनक) यांचे हस्ते दिनांक २६ नोव्हेंबर रोजी अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे येथे देण्यात आला.
पुरस्कार हे केलेल्या कामाची पावती व येणाऱ्या काळात अधिक उत्तम कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देणारे असतात, पुरस्कार हा भूत काळासाठी सन्मान व भविष्य काळासाठी जबाबदारी वाढवणारा असतो असे प्रतिपादन याप्रसंगी समाज भूषण पुरस्कार विजेते श्री. भूषण सोंजे यांनी दिले.
भूषण प्रदीप सोंजे यांचा कार्य परिचय –
अनेक विध कार्यक्रमात सुत्र संचालन, निवेदक , मुलाखतकार अशा विविध भूमिका बजावत स्व कर्तृत्वावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
विद्यार्थी बक्षिस समारंभ, वधू वर परिचय मेळावे रक्तदान शिबिर, महिला दिन, समाज संस्कृती दिवस अशा विविध कार्यक्रमाचे प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून आयोजन.
कोरोना काळात ऑनलाईन कार्यक्रम – फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाची संकल्पना सर्वप्रथम मांडली व lockdown सुरु झाल्यापासून सलग २ महिने दररोज समजातील विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आदर्श व्यक्तिमत्वाची मुलाखत घेतली यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती झाली व त्यातून ते प्रेरित झाले. यात UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा पास होत IAS, IRS तसेच ACP, CA, बँकिंग, बॉलीवूड, विविध इंडस्ट्री, न्यायाधीश, कृषी शास्त्रज्ञ, सायबर तज्ञ, पायलट, हवाई सुंदरी अशा अनेक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
त्यानंतर ऑनलाईन शोकसभेचा पायंडा समाजात पाडला व करोना काळात परिस्थितीवर मार्ग काढत समाजाला दिशा दिली.
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते व विविध दायित्व निर्वहन करत सध्या काळेवाडी नगर सहकार्यवाह अशी जबाबदारी त्यांच्या कडे आहे.
– करोना काळात अनेक गरजूंना मोफत धान्य वाटप, रक्त पुरवठा, बेड उपलब्धता, इंजेक्शन उपलब्धता अशा अनेक आघाड्यांवर काम केले.
– प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून काम करीत असताना झिंगाट, जल्लोष सारखे सांस्कृतिक कार्यक्रम करीत युवकांचे मोठे संघटन सहकाऱ्यांच्या मदतीने उभे केले.
– ओबीसी आरक्षण अबाधित रहावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करीत समाज मान्यवरांच्या गाठी भेटी घेत, गावोगावी बैठका घेत समाज जागृती व संघटन करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात नियुक्त आयोगाशी पत्र व्यवहार, त्यांना वेळोवेळी भेटून मागणी संदर्भात निवेदन देणे असे अनेक समाजपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.
Bhushan Sonje Awarded as a Samaj Bhushan