नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्राला नाशिक-मुंबई मार्गे जोडणारी भुसावळ-पुणे एक्सप्रेस पुन्हा सुरू होत आहे. २० मे पासून ही एक्सप्रेस रुळावर धावणार आहे. गेल्या २ महिन्यांपासून ही एक्सप्रेस बंद होती. सध्या उन्हाळी सुट्या सुरू आहेत. आणि अशातच ही एक्सप्रेस सुरू होत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जत येथे रेल्वे कामासाठी मेगाब्लॉक होता. त्यामुळे भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस दोन महिने रद्द करण्यात आली होती. कर्जत येथील रुळाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे भुसावळ-पुणे रेल्वे पुन्हा धावमार आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य नितीन पांडे यांनी केले आहे.
Bhusawal Pune Railway Express Again Start