नाशिक – नाशिक शहरात सुरू असलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरात विविध भागांची पाहणी करत लॉकडाऊनचा आढावा घेतला.
नाशिक शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सायंकाळी ५.३० नंतर नाशिक शहरात विविध ठिकाणी पाहणी केली. या पाहणीला सिडकोतून सुरुवात करण्यात आली. सदर पाहणी मोरवाडी, उत्तम नगर, पवन नगर, त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल, सिव्हिल, सीबीएस, शालिमार, दूध बाजार, मेन रोड, अशोक स्तंभ, पंचवटी, पंचवटी भाजी मार्केट, पेठ रोड, रामवाडी, गंगापूर रोड, कॉलेज रोड मार्गे महात्मा नगर, एबीपी सर्कल, पिटीसी मार्गे पुन्हा मायको सर्कल, चांडक सर्कल, सारडा सर्कल, जुने नाशिक, बागवनपुरा, चौक मंडई, द्वारकामार्गे मुंबई नाका मार्गे नाशिक शहरात पाहणी केली. यावेळी शहरातील लॉकडाऊनच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला.