रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नामको हॉस्पिटल संचलित आरएमडी कोविड केअर सेंटरचे भुजबळांच्या हस्ते उदघाटन

मे 3, 2021 | 11:43 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210503 WA0012 e1620042089431

– अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सुरवात कौतुकास्पद;
–  आवश्यक औषधे देतांना रेमेडेसिव्हीरचा वापर शक्यतो टाळावे-  छगन भुजबळ

नाशिक – नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अवघ्या दहा दिवसांत नामको हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटरची सुरवात करण्यात आली, हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. कोरोनाचा रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक ती औषधे डॉक्टरांनी द्यावी परंतु रेमडिसिव्हिरचा वापर आवश्यक असेल तरच करावा शक्यतो त्याचा वापर टाळण्यात यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी केले आहे.

आज नामको हॉस्पिटल संचलित आर.एम. डी. कोविड केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार दिलीपराव बनकर, नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलालजी भंडारी, सचिव शशिकांतजी पारख, माजी आमदार वसंत गिते,विजय साने, हेमंत धात्रक, अशोक साखला, महेश लोढा,चंद्रकांत पारख,  प्रकाश दायमा, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप,रंजन ठाकरे, राजेंद्र डोखळे, जयप्रकाश जातेगावकर, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

IMG 20210503 WA0014

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रुग्णसंख्या वाढली असल्याने औषधे व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र तरी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा शासन, प्रशासन व सेवाभावी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेडची संख्या कमी असतांना आपण ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहेत. वैदयकीय क्षेत्रात ज्याला आवश्यक आहे त्याला प्राधान्याने मदत करून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ऑक्सिजनचा साठा मुबलक प्रमाणात ठेऊन कोविड केअर सेंटरचे काम सुरू ठेवावे. आपल्या पूर्वजांनी मोठं कष्टाने सामाजिक कार्य सुरू केलं आहे ते अविरत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. लॉकडाऊनचा परिणाम अतिशय चांगला होत असून रुग्ण संख्या कमी होण्यास त्याचा अतिशय फायदा होत आहे. पुढची लाट येण्याच्या अगोदर आपण तयारी ठेवावी लागेल. कायमस्वरूपी व्यवस्था झाल्याने याचा भविष्यात देखील उपयोगी ठरणार आहे असेही पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

यावेळी आमदार दिलीपराव बनकर म्हणाले की, नामको चॅरिटेबल हॉस्पिटलम व बँकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन बाबत योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

नामको हॉस्पिटल
नामको हॉस्पिटल गेल्या विस वर्षापासुन नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात कॅन्सर निदान व उपचार रुग्णसेवा धर्मार्थ दरात पुरवित आहे . आज १० बेडचा आय.सि.यु. ४ ऑपरेशन थियेटर , डायलिसीस सेंटरसह १०० बेडच्या या हॉस्पिटल मध्ये कॅन्सरसह मेडिसीन , गायनॅक . पेडियाट्रिक , ऑर्थोपेडिक , सर्जरी , न्युरो , युरो , इ.एन.टि. डेंटल , फिजीओथेरपी असे सर्वच मल्टिस्पेशालिटी विभाग रुग्णसेवेत कार्यान्वित झाले आहेत . ५० पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर्स , ७० परीचारीका व इतर रुग्णसेवक असा जवळपास २०० कर्मचारी नामको हॉस्पिटल मध्ये रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत असतात . नामको हॉस्पिटल मध्ये दरवर्षी साधारण २७००० रुग्णांना बाहयरुग्णसेवा , ११०० रुग्णांना किरणोपचार , १७०० पेक्षा जास्त कॅन्सर शस्त्रक्रिया , ९ ०० जनरल शस्त्रक्रिया , ७००० रुग्णांना किमोथेरपी , जवळपास १००० रुग्णांना एंडोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा विवीध शासकिय योजनांच्या माध्यमातुन मोफत पुरविल्या जातात . येत्या काळात १००० बेडच्या विस्तारीकरणासह नामको हॉस्पिटल अनेकविध नवनविन सेवासुविधा रुग्णसेवेत समर्पित करणार आहे . महाराष्ट्रातील आदर्श असे धर्मार्थ बोन मॅरा सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे . नाशिक शहरातील सर्वात प्रगत , अत्याधुनिक व धर्मार्थ नामको काडिआक केअर सेंटरचे देखील बांधकाम जोमाने सुरु आहे.

नामको कोविड केअर सेंटर
नामको विश्वस्त मंडळाने अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रशस्त , हवेशीर व आठ बायपॅप व्हेंटीलेटरसह आठ बेडचा अतिदक्षता विभाग व ऑक्सीजन सुविधेसह ४२ बेड कोविड रूग्णांसाठी उभारल्या आहेत. फक्त १० दिवसातच या कोविड केअर सेंटरचे व्हेंटिलेटर्स , बायपॅप मशीन्स , ऑक्सीजन , गॅस पाइपलाईन , बायपॅप , हेंटीलेटर्स , मल्टीपॅरा मॉनीटर्स , ईन्फुजन पंप इ . उपलब्ध करून प्रत्येक वार्डात करमणूकीसाठी टी.व्ही . वाय फाय , टेलीफोन यंत्रणा , पिण्याचे गरम व थंड पाणी , अत्याधुनिक ३ फोल्ड बेड , साईड लॉकर , कार्डिआक टेबल , येण्या व जाण्यासाठी स्वतंत्र प्रशस्त रस्ते तसेच तज्ञ कन्सल्टंटस , प्रशिक्षीत निवासी डॉक्टर्स , परीचारीका , सेवकवर्ग व आरोग्यदायी आहार या सर्व प्रकारच्या सेवा , सोयीसुविधा शासकिय दरात रूग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत . अतिशय नयनरम्य अशी अंतर्गत सजावट , सेवाभावी व तज्ञ ४ कंन्सल्टंटस , १५ प्रशिक्षीत निवासी डॉक्टर्स , ३४ परीचारीका व सेवक वर्ग यामुळे या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेतांना रुग्णांचे मनोबल उंचावुन त्यांचा कोरोनातुन मुक्त होण्यास मदत होणार आहे.

IMG 20210503 WA0011

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चौकशी अधिकारी छळ करीत असल्याचा IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांचा आरोप

Next Post

पीपीसीआरने दिले जिल्हा रूग्णालयासाठी दिले २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ५ ‘बीआयपीएपी’ यंत्र

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Civil

पीपीसीआरने दिले जिल्हा रूग्णालयासाठी दिले २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व ५ ‘बीआयपीएपी’ यंत्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011