मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज रविवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सुध्दा या कारवाईबाबत प्रतिक्रिया नाशिक येथे दिली. भुजबळ म्हणाले की, ते अपेक्षित होते. तपास सुरु झाला की, ऑफीस, घर, आणखी कुठे आढळले असेल तर तेथे ते तपास केला जातो. माझ्याकडे कितीतरी धाडी पडल्या. त्या मोजता येणार नाही. तो त्यांच्या तपासाचा भाग आहे असेही ते म्हणाले.
राऊत यांच्यावर पत्रा चाळ घोटाळ्यात हेराफेरीचा तसेच तपासात सहकार्य न केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांना चौकशीसाठी अटक केली जाऊ शकते. दुसरीकडे, या छापेमारीदरम्यान संजय राऊत यांची प्रतिक्रियाही समोर आली असून त्यांनी ट्विटची मालिका केली आहे. त्यानंतर राज्यात विविध नेत्या प्रतिक्रिया देत आहे. त्यात भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.