नाशिक – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ आणि भाजप आमदार राहुल आहेर यांच्यात खडाजंगी झाली. शासकीय रुग्णालयातील खाटा वाढवण्यावरून हा वाद झाला.
या बैठकीत आमदार डॅा. राहुल आहेर यांनी अधिकारी दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला. यावेळी भुजबळ यांनी ही बैठक आरोप करण्यासाठी नव्हती असे आमदार आहेर यांना सांगितले. ऑक्सिजनची खातरजमा झाल्याशिवाय बेड वाढवणे योग्य नाही असेही ते म्हणाले. या वादानंतर भुजबळ यांनी आकडेवारीबाबत त्यांचा गैरसमज दूर झाला, तो मुदा योग्य वाटत नाही असे स्पष्टीकरण दिले.
या बैठकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख रशिद, आमदार सर्वश्री नरेंद्र दराडे, किशोर दराडे, ॲङ माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नितीन पवार, ॲङ राहुल ढिकले, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वासंती माळी, अन्न औषध प्रशासनच्या सहायक आयुक्त माधुरी पवार, महानगरपालिका बिटको रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
–
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!