इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आंदोलनानंतर काढण्यात आलेल्या जीआरविरोधात दंड थोपटत मंत्री छगन भुजबळ य़ांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात जीआर विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहे.
दरम्यान मराठा समाजाने देखील उच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांच्यावतीने ती दाखल करण्यात आली आहे.
मराठा आंदोलनानंतर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेपाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. यानंतर छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले. त्यानंतर त्यांनी आता थेट न्यायालयाचा याचिका दाखल करण्याचा निर्णय़ घेतला आहे.