नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक येथील कार्यालयात अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगर्स क्लब ऑफ नाशिक या संस्थेच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जॉगर्स क्लब ऑफ नाशिकच्या सदस्यांच्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, जॉगर्स क्लबचे अध्यक्ष दिपक भोसले, सदस्य कृष्णा नागरे, जगदीश गडकरी, सुनिल घोलप,भरत गुरव, हेमंत गोसावी, दिपक काळे, देवा शिंपी यासह क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.