इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाला पहिल्या दिवशी अवघे काही वेळ हजेरी लावत नाशिक गाठले. त्यानंतर त्यांनी अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचेही जाहीर करत थेट राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर हल्लाबोल केला. या आरोपानंतर ते नाशिकला प्रमुख कार्यकर्त्यांना भेटले व येवला येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. आज ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांबरोबर बोलणार आहे. त्यानंतर ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादीमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या असून भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे तिन्ही नेते नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ हे राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आहे. त्यांच्यासारखा मोठा चेहरा गमावणे अजितदादांच्या राष्ट्रवादीला परवडणारा नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहे.
भाजपमध्ये जाण्याची शक्यता
छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. कालच भुजबळांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांना मी मंत्रिमंडळात असावे असे वाटत होते. त्यामुळे ही शक्यता वर्तवली जात आहे. भुजबळ भाजपमध्ये राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर कोठेही काम करु शकतात…