नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक झाल्याचे चित्र नाशिकमध्ये बघायला मिळाले. त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक कार्यालयाबाहेर टायर जाणून अजित पवारांचा निषेध केला. त्यानंतर सोशल मीडियावरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
छगन भुजबळांची ही नाराजी दूर करण्यासाठी आता त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिपद न दिल्यामुळे रविवारी मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यालाही भुजबळ उपस्थित राहीले नाही. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. पण, त्यांचे समर्थक प्रचंड संतापले आहे.
भुजबळ हे ओबीसी नेते असून त्यांना का डावल्यण्यात आले याचे कारण अद्यापही समोर आले नाही. राष्ट्रवादीत ते जेष्ठ नेते आहे. असे असतांना त्यांचे नाव न येण्यामागे काय कारण आहे हे अद्यापही राष्ट्रवादीने अधिकृतपणे स्पष्ट केले नाही.