बुधवार, जुलै 30, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार खो-यातील ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन मांजरपाडा प्रकल्पात आणणार…मंत्री छगन भुजबळ

by Gautam Sancheti
ऑगस्ट 31, 2024 | 7:00 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 78

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी आज येवल्यातील डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून यापुढील काळातही पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नाही तर पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र. ३ व ४ च्यार माध्यमातून पार खो-यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन आपण मांजरपाडा मध्ये आणणार आहोत. हे पाणी पूणेगांव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची तहान भागून आपण वैजापूर , संभाजीनगरला सुद्धा पाणी देणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, अॅड. रविंद्र पगार, अंबादास बनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सविता पवार,राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अरुण थोरात, प्रेरणा बलकवडे, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, डी. के. जगताप, हुसेन शेख, राजश्री पहिलवान, भाऊसाहेब बोचरे, मोहन शेलार, किसनराव धनगे, संतु पा. झांबरे, डॉ. श्रीकांत आवारे, बाळासाहेब पिंपरकर, बाळासाहेब गुंड, दत्तुपंत डुकरे, दत्तकाका रायते, दिपक लोणारी, निसार शेख, राजेश भांडगे, अमजद शेख, मंगेश गवळी, प्रा. अर्जून कोकाटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ आपले मनोगतात म्हणाले, या योजनेचा DPR सुद्धा तयार झालेला आहे. मेरीच्या SLTAC कमिटीच्या मान्यतेनंतर हा DPR शासनाकडे मंजुरीसाठी येणार आहे. आगामी काळात आपण दरसवाडी धरणाची क्षमता सुद्धा वाढवणार आहोत. पुणेगांवमध्ये आणखीनही कुठून पाणी शकतो याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव आणि नरहरी झिरवाळांसोबत चर्चा सुद्धा झाली आहे. मांजरपाडा-गुगुळ या प्रवाही वळण योजना राबवून या वळण योजनांचे पाणी पुणेगांव मध्ये आणण्यांसाठी सर्वेक्षण करुन DPR तयार करण्याणच्या सुचना दिलेल्या आहेत.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवल्याला कुठल्याही परिस्थिती पाणी आणण्याचे असा निश्चय आपण केला होता. येवलेकराना पाणी आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण चंग बांधला होता. आज अनेक अडचणींवर मात करत डोंगरगावमध्ये पाणी दाखल झालं असून दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यापुढील काळातही अधिक आपले हे काम सुरू राहील.येवला तालुक्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी लवकरच उपलब्ध होईल. यासाठी अनेक योजना प्रगतीपथावर असून लवकरच या योजना पूर्ण होऊन पाणी उपलब्ध होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला मतदारसंघात आपण हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहे. आता पिंपळस ते येवला रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी ५६० कोटी रुपये मंजूर होऊन लवकरच काम सुरू होईल. राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी १८८ कोटी, धुळगावसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी ७३ कोटी, येवला शहरात ८८ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, २००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीक असल्याने अनेक अडचणी होत्या, कालव्याची दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर कालव्याचे नव्याने विस्तारीकरण व अस्तरीकरण करण्याची गरज समोर आली. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काँक्रीटीकरण व अस्तरीकरणासाठी २४२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. काम वेगाने होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक २० किमी अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे काम हे काम सुरू होते. या अथक प्रयत्नानंतर दीड वर्षांची मुदत असलेले हे काम अवघ्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. मांजरपाडा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आवक सुरू झाली. पुनेगाव व दरसवाडी धरण भरून पाणी येवल्याच्या हद्दीत दाखल झाले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, येवला तालुक्यातील पूर्व भागासोबतच चांदवड तालुक्याला देखील या पाण्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. येवलेकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी भावूक होत व्यक्त केल्या. येवलेकरांनी माझ्यावर दाखवलेल्या विशेष प्रेमामुळे या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करू शकलो. यापुढेही विकासाची ही कामे अविरत सुरु राहतील असा विश्वास यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले की, इतक्या वर्ष माय माऊलीचे अश्रू पुसण्यासाठी आजचा दिवस आहे. यात कुठलाही राजकारण नाही. या आनंदाच्या क्षणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, बाजार समितीच्या सभापती सविता पवार, लक्ष्मण कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न, बेदाण्याला शेतमालाचा दर्जा व जीएसटी रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत झाले हे निर्णय

Next Post

देवी मंदिराच्या दानपेटीतील २५ हजाराची रोकड चोरट्यांनी केली लंपास…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime1

देवी मंदिराच्या दानपेटीतील २५ हजाराची रोकड चोरट्यांनी केली लंपास…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011