नाशिक – कोरोनामुळे गेली दोन वर्षे सण उत्सव साजरे करण्यावर अनेक बंधने होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले असून राज्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा आनंदात सण उत्सव साजरे करावे असे आवाहन करत आज नाशिक येथील कार्यालय नात भुवनेश्वरी सोबत गुढी पाडवा उत्साहात साजरा केला. तसेच राज्यातील सर्व नागरिकांना येणारे वर्ष हे आरोगीदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड,माजी आमदार जयवंतराव जाधव, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे,युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, मनपा माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, जिवन रायते,संजय खैरनार, महेश भामरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, संतोष डोमे,अमर वझरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेले दोन वर्षे कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करण्यावर बंधने होती. सर्वांच्या दृष्टीने अतिशय दु:खदायी वर्ष होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले असून पुन्हा एकदा सण उत्सव साजरे करण्यात येत आहे. निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गुढी पाडवा हा पहिलाच सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यात यावा.आपण महात्मा फुले, छत्रपती शाहू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपण काम करतो आहोत. नववर्षात सर्व राजकीय पदाधिकारी आनंदाने एकत्र यावे. एकमेकांचे काटे न काढता सर्व राजकीय बांधवांनी सामोरा समोर येऊन आनंदात एकमेकांना सहाय्य करत काम करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केलं.