मुंबई – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी “श्रीं”च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर आणि जगावर आलेलं कोरोनाचे संकट दूर होउदे अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ , माजी आमदार पंकज भुजबळ आणि संपूर्ण भुजबळ कुटुंबिय उपस्थित होते.