सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट निमार्ण करण्याचे पालकमंत्री भुजबळांचे आदेश

by Gautam Sancheti
मे 2, 2021 | 10:34 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210502 WA0017 1 e1619951942343

नाशिक-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात ९ रुग्णालयांमधील ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर आता उर्वरित सर्व शासकीय रुग्णालयांत देखील ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करावी असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून गेल्या आठवड्यातच पहिल्या टप्प्यातील ९ रुग्णालयांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १० कोटी ८८ लक्ष रुपयांच्या या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर केंद्र सरकारकडून ४ ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर मधून २ ठिकाणी प्लांट बसविले जाणार आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित १६ रुग्णालयांत देखील लवकरच स्वतःचा ऑक्सिजन प्लांट निर्माण होऊन जिल्ह्यातील सर्व ३१ शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या होत्या. नाशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड या उपजिल्हा रुग्णालयात तर सिन्नर,पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात सदर प्लांट कार्यान्वित होणार आहे. तर केंद्र सरकारकडून नांदगाव, दाभाडी, पेठ, सुरगाणा या चार ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर येथे ऑक्सिजन प्लांट निर्माण होणार आहे.
जिल्ह्यातील उर्वरित अभोणा, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, हरसूल, गिरणारे, निफाड, लासलगाव, नगरसुल, उमराने, देवळा, सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे तर मालेगाव मधील महिला रुग्णालय व जनरल हॉस्पिटलमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्यात येणार आहे.
सदर ऑक्सिजन प्लांट अतिशय उपयुक्त ठरणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केरळमध्ये डाव्यांचीच सरशी; विजयन मुख्यमंत्रीपदी कायम

Next Post

आसाममध्ये पुन्हा फुलले कमळ; काँग्रेसची पराभवाची मालिका कायम

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

या चार दिवसा दरम्यान मान्सून होणार सक्रिय…बघा, हवामान तज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 24, 2025
image0015VMW e1756058042931
संमिश्र वार्ता

आसामला ६० वर्षांच्या भाडेतत्त्वावर मुंबईतील कुलाबा येथील भूखंड…केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा

ऑगस्ट 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास टाळावा, जाणून घ्या, सोमवार, २५ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 24, 2025
WhatsApp Image 2025 08 24 at 16.34.15 1 1024x683 1
संमिश्र वार्ता

देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर शुभारंभ

ऑगस्ट 24, 2025
Screenshot 2025 08 24 190430.jpg
महत्त्वाच्या बातम्या

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

ऑगस्ट 24, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरु देऊ नका…मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

ऑगस्ट 24, 2025
प्रातिनिधिक फोटो
स्थानिक बातम्या

मालेगावमध्ये चार वर्षीय मुलीला गिराणा नदीच्या पात्रात फेकून बापाने स्वत:ही पाण्यात उडी मारत आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

ऑगस्ट 24, 2025
IMG 20250824 WA0380 1
राज्य

द्राक्ष बागाईतदार संघाच्या मागण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले हे वक्तव्य

ऑगस्ट 24, 2025
Next Post
E0YIllZUYAAyJRT e1619952778376

आसाममध्ये पुन्हा फुलले कमळ; काँग्रेसची पराभवाची मालिका कायम

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011