नाशिक – चिपळून तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय डेरवण यूथ चॅम्पियन जलतरण स्पर्धेत भोसला साई केंद्राच्या जलतरण पटूंनी १७ पदकांची कमाई केली आहे. या केंद्रातील साईचे जलतरण प्रशिक्षक प्रसाद खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली, ओवी शहाणे १ सुवर्ण,३ रौप्य, रुद्र बच्छाव २ कांस्य, आत्मजा शहाणे १ रौप्य, आश्लेषा आहेर १ रौप्य, अबीर धोंड १ सुवर्ण ४ रौप्य, मयांक धामणे २ रौप्य २ कांस्य, यांनी एकुण २ सुवर्ण,११ रौप्य व २ कांस्य असे १७ पदके मिळविली आहेत, तर वेदांत गडाख आणि सुमेधी कुलकर्णी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व विजेत्या जलतरण पटूंचे भोसलाच्या कार्यवाह शीतल बेलगावकर, सचिव हेमंत देशपांडे, कामांडन्ट एम. एम. मसूर, मुख्य प्रशिक्षण अधिकारी जे. के.मिश्रा, जलतरण समिती सभापती प्रशांत नाईक, व भोसलाचे प्रशिक्षक घनश्याम कुंवर, विलास देशमुख यांनी अभिनंदन केले.