मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात भोंग्यांचा वाद आता पेटला आहे. मशिदींवरील भोंगे येत्या ३ मे पर्यंत उतरविण्याचा अल्टीमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही प्रतिक्रीया उमटत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही भोंग्याच्या वादात त्यांची भूमिका मांडली. त्यांनी राज ठाकरेंनाच आव्हान दिले. आता आम आदमी पार्टीने याविषयी ठाम भूमिका घेतली आहे. त्यासाठी आपने ट्विटरवरच हनुमान चालिसाचे पठण करण्याचे सुरू केले आहे. त्यात राज ठाकरे यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आपच्यावतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालय आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही या ऑनलाईन पठणाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
https://twitter.com/AAPMumbai/status/1518231189714501633?s=20&t=i3ansFpTG_R8WhJMseHtsg