नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व प्रचारक व नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम त्र्यंबक गारे (गारे काका) यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , १ मुलगा,२ मुली,जावई व नातवंड आहे.
१९८४ सालापासून संघप्रचारक म्हणून नंदुरबार, तळोदा या वनवासी क्षेत्रात त्यांनी काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य गिरीश कुबेर, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या समवेत संघ कार्य केले. प्रचारक म्हणून थांबल्यावर व्यवसाय म्हणून वृत्तपत्र विक्री केला .पहाटे पासून १० वाजेपर्यंत व्यावसायिक कामानंतर सर्व वेळ समाज सेवेसाठी ते उपयोग करत.
ग्रामीण विकासासाठी महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कुटीर उद्योग सुरू करणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, मंदिर ,गोशाळा, गो उत्पादन तयार करण्याचे प्रशिक्षण देणे असे बहुमोल कार्य केले. साधी रहाणी,कल्पक संघटक,सहज व दांडगा संपर्क, सहज संवाद हे गारे काकांचे वैशिष्ट्य होते.
