साप्ताहिक राशिभविष्य २९ ऑगस्ट ५ सप्टेंबर…
मेष- निर्णय घेण्यामध्ये दोलायमान मनस्थिती टाळावी व घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे सार्वजनिक कार्यात आघाडीवर राहाल धार्मिक कार्य पार पडेल.
वृषभ- फायद्याचे आणि तोट्याचे व्यवहार याच्या अंदाज प्रक्रियेत गल्लत करू नये योग्य तिथेच वेळ खर्च करावा भावना आणि व्यवहार यामध्ये दोलायमान स्थिती टाळावी.
मिथुन– चित भी मेरी पट भी मेरी असा स्वभाव नको कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नये जुन्या चिंता मिळतील गुंतवणुकीस अपेक्षित रिटर्न मिळेल.
कर्क- विनाकारण वादांमध्ये पडू नये शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पडतील आर्थिक दृष्ट्या स्पर्धात्मक सप्ताह गुंतवणुकीचा दीर्घकालीन विचार करावा.
सिंह- कौटुंबिक जबाबदारी वाढेल चिडचिड टाळावी अनपेक्षित सुखद घटना घडेल आर्थिक भार वाढल्यास परफेक्ट प्लॅनिंग करावे. कन्या- घर सजावटीच्या नवीन नवीन कल्पना सुचतील मनासारखा मेनू बनेल मनासारखी खरेदी होईल अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
तूळ- कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आर्थिक मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करा अनपेक्षित खर्च टाळा शुभवार्ता मिळेल.
वृश्चिक– अनपेक्षित जबाबदारी वाढेल सहन शक्ती वाढवा हितचिंतकांमुळे मानसिक आधार मिळेल प्रत्येक बाबतीत आपलाच हेका सोडावा.
धनु- सहकार्य करताना मागील अनुभव लक्षात ठेवावा टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारा परिचित सदस्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्या गैरसमज टाळा.
मकर- गैरसमजातून कोणतेही मत बनवू नये कामातील एकाग्रता वाढवावी विनाकारण वाद टाळावे मानसिक स्वास्थ्य सांभाळा……
कुंभ- बच्चेकंपनीला विविध बाबतीत यश मिळेल अनावश्यक खरेदी टाळा अनपेक्षित मोठा खर्च समोर येतील पोटाच्या तक्रारी सांभाळा योगासन प्राणायाम यावर भर द्या.
मीन- मागील अनुभव व भविष्यकालीन लॉजिक याचा समतोल साधून निर्णय घ्यावे बऱ्याच प्रकारच्या आर्थिक संधी उपलब्ध होतील ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा.
आजचा राहू काळ- दुपारी साडेचार ते सहा आहे.