भाऊबीज – यमद्वितीया – यमदीपदान
– पंडित दिनेश पंत
दीपावली पर्वातील शेवटचा शुभ दिवस म्हणजे भाऊबीज होय. बहिणीने भावाला औक्षण करण्याचा दिवस. भाऊबीज बद्दल सांगण्यात येत असलेली पौराणिक कथा म्हणजे नरकासूर राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्ण हे द्वारका नगरीत परत आले. त्यावेळी त्यांची बहीण सुभद्रा हिने या दिग्विजयाबद्दल भगवान श्रीकृष्णाचे औक्षण केले. याचे प्रतीक म्हणून भाऊबीजेला बहिण भावाला औक्षण करते. आपल्या संरक्षणाची जबाबदारी भावाकडे देते. बहिणीला साडीचोळी तसेच भेटवस्तू देऊन भाऊ देखील बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून आश्वस्त करतो.
यमद्वितीया यमदीपदान
मृत्यू देवता यम याची पूजा करून अपमृत्यू टाळण्यासाठी या दिवशी यमदीप लावला जातो. मातीच्या अथवा कणकेच्या पणती मध्ये चार दिशांना चार वाती प्रज्वलित करून मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला सुशोभित रांगोळीवर यमदीप लावला जातो.
यमदीप दान मुहूर्त
सायंकाळी 6:45 ते 7. 52 वाजता
औक्षण मुहूर्त
सकाळी 9 ते 10.30 हा राहू काळ सोडून दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत औक्षण मुहूर्त आहे.
सर्व वाचकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा