मुंबई – शारीरिक चाचणीत किंवा इतर परीक्षांमध्ये यश मिळत नसल्याने अनेकांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अर्धवर राहून जाते. मात्र अश्यांसाठी पुन्हा एक संधी चालून आहे. पण, त्यासाठी भरती होणे आवश्यक आहे. अर्धसैन्य दलात अतिरिक्त बटालीयन आणि मुख्यालयातील मागणी विचारात घेतली तर जवळपास १ लाख जवानाची भरती आवश्यक असल्याचे पुढे आले आहे.
सर्वच सुरक्षा दलांमध्ये मनुष्यबळाची उणीव आहे. मात्र भरती होत नसल्याने मोठे अंतर वाढत आहे. अर्धसैन्य दलाच्या कल्याणकारी संघटनेने हा मुद्दा पुढे करून सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बीएसएफमध्ये सर्वांत जास्त २९ हजार पदे रिक्त आहेत. सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्येही मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. ही संख्यादेखील २६ हजाराच्या आसपास आहे. एसएसबी आणि आयटीबीपीनेसुद्धा नव्या बटालियनचा प्रस्ताव सरकारला कधीचाच पाठविला आहे. इथेही जवानांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. संसदेत देण्यात आलेल्या उत्तरावरून एसएसबीमध्ये १८ हजार ६४३, आयटीबीपीमध्ये ५ हजार ७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ७ हजार ३२८ पदे रिक्त आहेत. नवी बटालीन आणि बीओपीच्या आवश्यकतेचा विचार केला तर ही संख्या त्याहीपेक्षा जास्त आहे.
नियुक्ती पत्रच नाही
अर्धसैनिक दलात शिपायांची १ लाख पदे रिक्त आहेत. जुन्या भरती प्रक्रियेत ५५ हजार मेडीकली फिट प्रशिक्षणार्थी होते. २०१८ च्या चाचणीत फीट आढळून आलेल्यांना नियुक्तीचे पत्रच देण्यात आले नाही. उशीर झाल्यामुळे अनेक जवान वयाच्या निकषातूनही बाहेर पडले आहेत.
म्हणून वाढले अंतर
नव्या भरतीसाठी उशीर होण्यासोबतच व्हीआरएस आणि निवृत्तीच्या कारणांनीही अंतर वाढत गेले. २०११ ते २०२० या कालावधीत ८१ हजार जवानांनी व्हीआरएस घेतले. तर १६ हजार जवानांनी नोकरीचा राजीनामा दिला.