पुणे – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी आहे. बाजारी भांडवल असलेली ही भारतातील सर्वात मोठी संप्रेषण कंपनी आहे. बीएसएनएल ही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये पहिली कंपनी होती जिने इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत केले. तसेच दूरसंचार क्षेत्रात भारत सरकारवरील ग्राहकांचा विश्वास वाढवला होता. मात्र आता बीएसएनएलची देखील खाजगीकरण तथा निर्गुंतवणूकीकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगण्यात येते. याला कारण म्हणजे बीएसएनएलला होत असलेला प्रचंड तोटा होय, हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या आता आपल्या अनेक योजना बंद करण्याच्या विचारात आहे, असे सांगण्यात येते.
भारत संचार निगम लिमिटेडने आपला प्रथम स्तरावरील भारत फायबर (FTTH) ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅन ‘100 GB CUL भारत फायबर’ मागे घेतला आहे. सर्व दूरसंचार मंडळांमध्ये तो त्वरित प्रभावाने 499 रुपयांच्या निश्चित मासिक शुल्कासह येतो. या योजनेत 100 GB ची FUP वापर मर्यादा ओलांडली जाईपर्यंत 50 Mbps डाउनलोड स्पीड (गती ) आणि 100 GB मर्यादा संपल्यानंतर 2 Mbps डाउनलोड गती प्रदान करत होती.
सदर कंपनीने पॅन इंडिया भारत फायबर ब्रॉडबँड योजना ही सर्व सर्कलमधील नवीन ग्राहकांसाठी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही ब्रॉडबँड योजना विद्यमान ग्राहकांसाठी सुरू राहील. तथापि, या ग्राहकांना ऑफरवर असलेल्या इतर काही नियमित भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
बीएसएनएल कॉर्पोरेट ऑफिसने सर्व दूरसंचार मंडळांना ट्राय (TRAI ) ला ऑनलाइन अहवाल देण्यासह सर्व नियामक यंत्रणेचे पालन करण्याचे आणि मंडळाची वेबसाइट ऑपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, योजनांच्या संख्येबाबत TRAI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे मंडळ सुनिश्चित करेल. या सूचना तत्काळ प्रभावाने सर्व मंडळांमध्ये लागू होतील.
तसेच BSNL 200GB CUL CS358 भारत फायबर प्लॅन 499 रुपयांच्या निश्चित मासिक शुल्कासह उपलब्ध होणार आहे. BSNL केरळ टेलिकॉम मंडळ विशिष्ट भारत फायबर (FTTH) प्लॅन ऑफर करत आहे. 200GB CUL Bharat Fiber CS358 – जे 200GB ची FUP मर्यादा संपल्यानंतर 200GB पर्यंत 50Mbps डाउनलोड गती आणि मर्यादा संपल्यानंतर 2Mbps गती देते.