मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतरत्न आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. लता दीदी यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली. त्यानंतर त्यांनी उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.
https://twitter.com/ANI/status/1480791847005929473?s=20
लता दीदी यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे सर्वप्रथम स्पष्ट झाले. मात्र, तपासणीअंता तो कोरोना न्यूमोनिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. लता दीदी यांना रविवारी रात्रीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ब्रीज कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांची टीम लता दीदी यांच्यावर उपचार करीत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. लता दीदी यांच्या उपचारांबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान, मंगेशकर कुटुंबातील इतर जणांनाही कोरोनाची बाधा झाली आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.