नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): शिवजयंतीनिमित्त बुधवार १९ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सकाळी ९.३० वाजता देशवासीयांना थेट प्रक्षेपणाद्वारे संबोधित करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता विद्यार्थ्यांची पदयात्रा मराठा प्रसारक समाजाचे केटीएचएम महाविद्यालय, नाशिक येथून सुरू होईल.
गंगापूर रोड, राजीव गांधी भवन सिग्नल, सीबीएस सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, हुतात्मा स्मारक, नाशिक, अशोकस्तंभ मार्गे पुन्हा पदयात्रा केटीएचएम महाविद्यालयात पोहोचेल. या पदयात्रेत किमान दीड हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी होतील.