रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नांदेड जिल्ह्यात जोरदार स्वागत (व्हिडिओ)

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2022 | 10:16 pm
in राज्य
0
Capture 8

 

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने आज महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.जिल्ह्यातील देगलूर येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. काँग्रेसबरोबरच विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून भारत जोडो यात्रेचे स्वागत केले जात आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. आज महाराष्ट्रात यात्रेला सुरुवात झाली आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास पदयात्रा देगलूरमध्ये आली. यावेळी पदयात्रेकरूंच्या हातात मशाली होत्या. राज्यातील यात्रेचा समन्वय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. या पदयात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली आहे. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

LIVE: #BharatJodoYatra देगलूर, नांदेड येथे स्वागत #मी_पण_चालणार https://t.co/hSkvyrBQ3M

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 7, 2022

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेदेखील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र यात्रेत आपण सहभागी होण्याचे अजून ठरले नसल्याचे उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच शरद पवारांची प्रकृती ठीक असल्यासच ते सहभागी होतील, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसेच, भारत जोडो यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. ८ नोव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री बारा वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेणार आहेत.

पाच जिल्हे, चौदा दिवस
ही यात्रा नांदेडमध्ये चार आणि हिंगोली जिल्ह्यात चार दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करणार आहे. नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील. मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ, बुधवारी – वझिरगाव फाटा, गुरुवार- पिंपळगाव महादेव आणि शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून १४ दिवस ही यात्रा तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये राहुल गांधींच्या यात्रेत शरद पवारांच्या सहभागाची उत्सुकता आहे. तसेच राहुल गांधींना महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो हे आगामी १५ दिवसांत दिसून येणार आहे.

Bharat Jodo Yatra Welcome in Maharashtra Video
Congress MP Rahul Gandhi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आज शाब्दिक संयम पाळावा; जाणून घ्या, मंगळवार ८ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – …हे करुन मोकळे व्हा

Next Post
Vichar Pushpa e1661943624606

इंडिया दर्पण - विचार पुष्प - ...हे करुन मोकळे व्हा

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011