नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार वर्षांपूर्वी साताऱ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं भर पावसात भाषण झालं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत चित्रच पालटलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आजच्या भाषणाने ही आठवण ताजी केली. निमित्त होतं भारत जोडो यात्रेच्या समारोपाचे आणि स्थळ होते श्रीनगर!
जानेवारी महिन्यात श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी असणार हे माहिती असतानाही राहुल यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप तिथे निश्चित करण्यात आला. त्यानुसार राहुल यांची सभा सुरू झाली. ही सभा सुरू असताना जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली पण राहुल यांनी भाषण थांबवलं नाही. त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निषाणा साधला. ‘आम्ही इथे चार दिवस फिरलो. भाजप किंवा संघाचा एकही नेता इथे फिरू शकणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. अर्थात इथले लोक त्यांना फिरू देणार नाही असे नाही, तर भाजप आणि संघाचे लोक स्वतःच घाबरलेले आहेत म्हणून त्यांची हिंमत होणार नाही,’ असे राहुल म्हणाले. सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांना उद्देशून, हिंसा काय असते याचा अनुभव मी घेतला आहे, असेही ते म्हणाले.
आजीला गोळी लागली होती
यावेळी राहुल गांधी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची आठवण करून दिली. ते म्हणाले की, ‘मी चौदा वर्षांचा होतो. शाळेत वर्गामध्ये बसलो होतो. भुगोलाचा क्लास सुरू होता. त्याचवेळी एक शिक्षक आले आणि मुख्याध्यापकांनी बोलावल्याचा निरोप दिला. मी मुख्याध्यापकांच्या कॅबीनमध्ये गेलो, तर घरून फोन आला होता. मी रिसीव्हर कानाला लावला आणि पलीकडून आमच्या घरी काम करणाऱ्या बाईंचा ओरडण्याचा आवाज आला… ‘राहुल, आजीला गोळी लागली आहे’.
मोदींना कळणार नाही
मी काय बोलतोय हे मोदी, शहांना कळणार नाही. काश्मीरचे लोक आणि सैन्यातील जवान समजू शकतात. पुलगावमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना काय वाटत असेल, हे मी समजू शकतो. काश्मिरी लोक मारले जातात तेव्हा काय वाटत असेल हे मी आणि माझी बहीण चांगल्याप्रकारे समजू शकतो, असेही राहुल म्हणाले.
https://twitter.com/bharatjodo/status/1619960169395544065?s=20&t=GoW7S5TvbF9D9_xwK0rocA
Bharat Jodo Yatra Rahul Gandhi Speech in Snow Fall
Kashmir Congress