नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा आता कर्नाटकमध्ये आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार आहे. एकूण ३५०० किमीचा प्रवास यादरम्यान होणार आहे. या यात्रेत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनीया गांधी यासुध्दा सामील झाल्या. यावेळी आईबरोबरच राहुल गांधीचे फोटो सध्या चर्चेत आहेत. यालील एका फोटोने मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे…
सध्या राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असा भारत दौरा करत आहेत. सध्या ही यात्रा भारतीय जनता पक्ष (भाजप) शासित कर्नाटकातून जात आहे. आज त्यांच्या आई आणि काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही त्यात सामील झाल्या. अलीकडच्या काळात राहुलचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. आज सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोमध्ये तो रस्त्याच्या मधोमध आईच्या बुटांची लेस बांधताना दिसत आहे.
मां ❤️ pic.twitter.com/0UgqF9hfw6
— Congress (@INCIndia) October 6, 2022
सोनिया गांधी यांनी मंड्या जिल्ह्यातील डाक बंगला भागातून पदयात्रेला सुरुवात केली. त्या पहिल्यांदाच ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील झाल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर मंड्यातील सोनियांची पदयात्रा या अर्थानेही लक्षणीय आहे की, हे देवेगौडा कुटुंबाचे वर्चस्व असलेले क्षेत्र मानले जाते. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले, “सोनिया गांधी या यात्रेत सामील झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे कर्नाटकात पक्ष आणखी मजबूत होईल.
राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. या यात्रेचा प्रवास कर्नाटकात आला आहे. या यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होईल. या यात्रेत एकूण ३५७० किमी अंतर कापले जाणार आहे. काँग्रेसने राहुलसह ११९ नेत्यांची नावे ‘भारत यात्री’ अशी ठेवली आहेत, जे काश्मीरला पदयात्रेला जाणार आहेत. हे सर्व जण पायीच कन्याकुमारीपासून थेट काश्मिरपर्यंत जाणार आहेत. ही यात्रा पक्षासाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास काँग्रेसला वाटतो.
ये जो चेहरे की मुस्कान है।
उसकी ताकत हिंदुस्तान है।।कहा जाता है कि जब आप अच्छे काज के लिए निकलते हो, तो चेहरे से मुस्कान गायब नहीं होती।#BharatJodoWithSoniaGandhi pic.twitter.com/P1FOo3KmWD
— Congress (@INCIndia) October 6, 2022