नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चमकत्या गुजरातचा वारसा प्रदर्शनीय स्वरूपात मांडण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत योजनेच्या धर्तीवर या रेल्वे गाडीचं आरेखन करण्यात आलं आहे. उत्कृष्ट प्रतीची भारत गौरव डीलक्स वातानुकुलित पर्यटन ट्रेनमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी असून संपूर्ण प्रवास आठ दिवस चालणार आहे
या पर्यटन रेल्वे गाडीत प्रथम श्रेणीचे चार डबे, द्वितीय श्रेणीचे दोन डबे एक संपूर्णपणे सुसज्ज पॅन्ट्री डबा आणि दोन उपहारगृह असणार आहेत. यात १५६ प्रवासी सामावले जाऊ शकतात. महत्त्वाची पर्यटन स्थळ आणि गुजरातच्या वारसा स्थळांचा समावेश यात असणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, चंपानेर, सोमनाथ, द्वारका, नागेश्वर, बैत द्वारका, अहमदाबाद, मोठेरा आणि पटण ही प्रवासादरम्यानची मुख्य आकर्षण असतील.
प्रवासी गुरुग्राम, रेवरी, रिंगासं, फुल्लेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकावर या पर्यटन रेल्वे गाडीत चढू व उतरू शकतात आयआरसीटीसीने ग्राहकांसाठी सुलभ मासिक हत्यांद्वारे प्रदान करण्याच्या हेतूने सुलभ देय रचना (Payment gateway) उपलब्ध केली आहे. भारतीय रेल्वेने गर्वी गुजरात ही विशेष यात्रा चमकत्या गुजरातचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा भारत गौरव वातानुकुलित रेल्वे गाडीच्या माध्यमातून प्रदर्शनीय स्वरूपात समोर आणण्याचा उपक्रम आखला आहे. आयआरसीटीसी चालवणार असलेली ही विशेष पर्यटन रेल्वे गाडी २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकांवरून आठ दिवसाच्या प्रवासाला निघणार आहे. गुरुग्राम, रेवरी, रिंगासं, फुल्लेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेत चढण्याची आणि उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे.