भारत – एक दर्शन
भाग ३१
विश्वगुरु भारत
अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, हा असा काळ आहे की जेव्हा, भारताची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे. हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे. हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हावयच्या आहेत.
आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत. आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.
आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी. आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे. (श्रीअरविंद)
श्रीअरविंद आश्रमाच्या संस्थापक श्रीमाताजी भारताबद्दल म्हणतात, भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. ‘भारत हा विश्वगुरू आहे’. विश्वाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा विश्वामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.
भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.
– श्रीमाताजी
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan World Power India Shreearvind