गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत – एक दर्शन (भाग २०)… भारताचे भाषा वैभव

by Gautam Sancheti
ऑगस्ट 31, 2023 | 5:06 am
in इतर
0
bharatmata

विशेष लेखमाला
भारत – एक दर्शन (भाग २०)
भारताचे भाषावैभव

संस्कृत भाषेतील प्राचीन आणि अभिजात ग्रंथांची गुणवत्ता, त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या उत्कृष्टतेची विपुलता, त्यांच्यामध्ये असणारी मौलिकता, त्यांचे सामर्थ्य आणि सौंदर्य, त्यांच्यातील आशय, त्यांची कला व रचना, त्या ग्रंथांमधील भाषेचे वैभव, विषयाला दिलेला न्याय, त्यांच्या वाणीची मोहकता, त्यांच्या प्रवृत्तीच्या पल्ल्याची उंची आणि रुंदी या सर्वच दृष्टींनी हे ग्रंथ जगाच्या महान साहित्यामध्ये निर्विवादपणे अग्रस्थानी बसण्यासारखे आहेत.

arvind

निर्णायक मत देण्याच्या योग्यतेच्या व्यक्तींकडून ज्या भाषेस सार्वत्रिक मान्यता मिळालेली आहे, ती स्वयमेव संस्कृत भाषा ही, मानवी मनाद्वारे निर्माण करण्यात आलेले सर्वांत भव्य, सर्वांत परिपूर्ण आणि आश्चर्य वाटावे इतके पर्याप्त कार्यक्षम साहित्यसाधन आहे. ही भाषा एकाच वेळी ऐश्वर्यशाली आहे, मधुर आहे, लवचीक आहे, सामर्थ्यवान आहे, सुस्पष्टपणे रचलेली आहे, आणि परिपूर्ण आहे, ती जोशपूर्ण आहे, सूक्ष्म आहे. आणि ज्या संस्कृतीचे ती प्रतिबिंबरूप माध्यम होती त्या संस्कृतीच्या आणि ज्या मनांना ती अभिव्यक्त करत होती त्या मनांच्या, वंशाच्या गुणवत्तेचा आणि त्यांच्या चारित्र्याचा पुरेसा पुरावाच म्हणता येईल अशी तिची गुणवत्ता होती आणि असे तिचे स्वरूप होते. संस्कृत कवींनी व विचारवंतांनी, तिच्या क्षमतांच्या वैभवाला साजेसा असा तिचा महान आणि उदात्त उपयोग करून घेतला आहे.

भारतीय मनाने जे अत्यंत प्रमुख, सृजनशील आणि भव्योदात्त साहित्य निर्माण केले आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा हा संस्कृत भाषेचा असला तरीदेखील केवळ संस्कृतमध्येच भारतीय मनाने उत्तुंग आणि सुंदर आणि परिपूर्ण गोष्टींची निर्मिती केली आहे, असे मात्र नाही. भारतीय साहित्याचा संपूर्ण अंदाज येण्यासाठी, संस्कृत भाषेप्रमाणेच, पाली भाषेमधील बौद्ध साहित्य आणि संस्कृतमूलक आणि द्राविडी अशा जवळजवळ बारा भाषांमधील काव्यात्मक साहित्याचा, – जे काही ठिकाणी सुसंपन्न आहे तर, काही ठिकाणी निर्मितीच्या दृष्टीने पाहता संख्येने तुरळक आहे, – अशा सर्व साहित्याचा धांडोळा घ्यावा लागतो.

…भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक ज्याला महान साहित्यकृती आणि थोर व्यक्ती म्हणतात त्यामध्ये वेद आणि उपनिषदे, महाभारत आणि रामायण ही महाकाव्ये, कालिदास, भवभूती, भर्तृहरी आणि जयदेव यांसारख्या थोर व्यक्ती तसेच भारतीय नाट्यशास्त्र, काव्य आणि अद्भुतरम्य अशा समृद्ध अभिजात रचनांचा समावेश होतो. त्यामध्ये धम्मपद आणि जातके, पंचतंत्र, गुरु नानक आणि संत कबीर आणि मीराबाई यांची भजने आणि संत तुलसीदास, विद्यापती आणि चंडीदास व रामप्रसाद, समर्थ रामदास आणि संत तुकाराम, तिरुवल्लुवर आणि कंबन तसेच तसेच दक्षिणी शैव संत आणि अलवार यांचाही समावेश होतो. तरी येथे केवळ सुविख्यात लेखक आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यकृतींचाच विचार केला आहे. उत्कृष्टतेच्या दृष्टीने प्रथम आणि द्वितीय श्रेणीमध्ये ज्यांची गणना होऊ शकेल असे विपुल साहित्य विविध भाषांमध्ये निर्माण झाले आहे. त्यांची जगामधील सर्वात जास्त विकसित आणि सृजनशील लोकांमध्ये आणि जगातील सर्वात महान सभ्यतांमध्ये निश्चितपणे गणना करावी लागेल.

– श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)

Bharat Ek Darshan Indian Language Splendor Shreearvind

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इलेक्ट्रिक खेळणी बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्यावर छापा…

Next Post

श्रीविष्णु पुराण… श्रीकृष्णाच्या बाललीला… पूतना राक्षसिणीचा वध आणि कालियामर्दन!

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
Next Post
bhagwan vishnu

श्रीविष्णु पुराण... श्रीकृष्णाच्या बाललीला... पूतना राक्षसिणीचा वध आणि कालियामर्दन!

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011