विशेष लेखमाला
भारत : एक दर्शन – ६
भारतमातेचे देह-चतुष्टय
(भारतीय मनाची देशाकडे पाहण्याची दृष्टी किती सखोल आहे, हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)
देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह असतो, त्याचा ‘अन्नमय कोश’ असतो, किंवा त्याला स्थूल शारीरिक देह – gross body – असे म्हणता येईल.
माणसांच्या समूहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापून जातो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा ‘प्राणमय कोश’, – life body – म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह असतो. हे दोन्ही देह स्थूल आहेत, मातेचे ते भौतिक आविष्करण असते.
स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो. विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, कृतार्थता, सभ्यता आणि संस्कृती या साऱ्यासाऱ्यांतून राष्ट्राचे सूक्ष्म शरीर – subtler body – आकाराला येते. शारीर-दृष्टीला दिसणाऱ्या बाह्य अस्तित्वाप्रमाणेच सूक्ष्म शरीर देखील मातेच्या जीवनाचाच एक भाग असतो.
राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये – casual body – जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यातून उदयाला येतो, युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, ती त्या राष्ट्राला इतरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण बनवते.
मातेचे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक ‘उगमस्रोत’ असतो, जो अमर्त्य, अचल असा असतो; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक ‘नारायणा’चे, ‘अनेकां’मध्ये वसणाऱ्या ‘एका’चे – ज्याची आपण सर्वजण बालके आहोत – त्या ‘एका’चे ते आविष्करण असते.
— श्रीअरविंद
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Bharat Ek Darshan Angel to View ShreeArvind