इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशातील कामगार संघटनेने ९ जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकाराच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्याच्या विरोधात हा बंद आहे. बुधवारी होणा-या या बंदमध्ये २५ कोटी कामगार भाग घेणार आहे. त्यामध्ये बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर या बंदमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा दिली आहे. त्यांच्यासोबत या संघटनांच्या संबधित इतर कामगार संघनांही त्यामध्ये सहभागी होणार आहे. सरकारच्या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. त्यांच्या एकुण १७ मागण्यांसाठी हा बंद आहे.
या बंदमध्ये बँकिंग, विमा कंपन्यांचे काम, पोस्ट ऑफिस, कोळसा खाणींचे काम, राज्य सरकारी वाहतूक सेवा, महामार्ग आणि बांधकाम काम, सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन या बंदमध्ये सहभागी होती. तर खासगी क्षेत्रातील कंपन्या, रुग्णालय, वैद्यकिय सेवा, आपत्कालीन सेवा, खासगी शाळा, महाविद्यालय आणि ऑनलाईन सेवा सुरु राहतील.