इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात २०२४ मध्ये एकंदर २४ कोटी १० लाख प्रवाशांची नोंद झाली असून, मुंबई-दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांच्या जोडीपैकी एक ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटना म्हणजे आयएटीएनं २०२४ चा जागतिक विमानवाहतुकीबाबतचा आकडेवारी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.
अमेरिका या यादीत सर्वोच्च स्थानावर असून, त्या देशात ८७ कोटी साठ लाख प्रवाशांची नोंद झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये ७४ कोटी १० लाख, तिसऱ्या क्रमांकावरच्या ब्रिटनमध्ये २६ कोटी, तर चौथ्या क्रमांकावरच्या स्पेनमध्ये २४ कोटी दहा लाख प्रवाशांची नोंद झाली आहे.