भारतीय लोकांना रोज ताजे दूध विकत आणणे व ते वापरण्याची सवय आहे. बऱ्याच ठिकाणी रोज आदल्या दिवशी संध्याकाळी आणून ठेवावे लागते. आणि मग दुसऱ्या दिवशी वापरले जाते. त्यातदेखील ऐन वेळेला कुठला किराणा संपला, रात्री कुठल्या गोष्टीची आठवण येते की, उद्या डब्याला काय भाजी लागणार आहे किंवा कुठला पदार्थ किरण्यातील घरात नाहीय. मग ऐन वेळेला तो पदार्थ कुठून आणायचं एवढ्या सकाळी कुठे दुकान उघडे असतील आणि आपल्याला चटकन आपल्याला हवी ती वस्तू प्राप्त होईल. घरोघरी प्रामुख्याने असलेल्या या प्रश्नावर उत्तर देत आहेत अनंत गोयल आपल्या मिल्क बास्केट या स्टार्टअप मधून. . .
अनंत गोयल २०११ पर्यंत परदेशातच नोकरी करत होता. आपले शिक्षण पूर्ण करून त्याला प्रदेशातील एका मोठ्या कन्सल्टींग फर्म मध्ये नोकरी मिळाली होती. २०११ मध्ये तो काही कालावधीसाठी भारतात आला आणि त्यानंतर आपले मूळ चे स्वप्न म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याबाबत त्यांनी आपल्या इतर तीन मित्रांशी चर्चा केली. आशिष गोयल अनुराग जैन आणि यतीश तलवाडीया या तिन्ही मित्रांसोबत त्याने चर्चा करून लवकरच आपली एक स्टार्ट उभी केली.
तुम्हाला तुमच्या घराचा रंग काम करायचा आहे का मग त्यासाठी तुम्ही कुठलातरी पेंटर बोलावून त्याच्या अनुभवाची खात्री नसताना देखील त्याला काम देणं हे जोखमीचे ठरू शकत, म्हणूनच या तिघांनी सहा लाख रुपये एकत्र करून एक पेंटिंग सर्विसची कंपनी सुरू केली. सुरुवातीला काही कस्टमर्स त्यांना मिळत देखील होते परंतु दोन वर्षांमध्ये कंपनीला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे ती कंपनी बंद करावी लागली. २०१३ मध्ये आणखी एक कंपनी त्यांनी सुरू केली ज्यात ऑनलाईन घरे भाड्याने देण्यात येत. परंतु त्यांच्या असे लक्षात आले की या सर्वांशी मुळात भारतीय बाजारात गरजच नाहीये. त्यामुळे अवघ्या एकाच वर्षात ही कंपनीदेखील बंद करावी लागली. हे दुसऱ्या कंपनीमध्ये त्यांना एकूण आठ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता.
दोन मोठे अपयश आल्यानंतर देखील व्यवसाय करण्याची खुमखुमी मात्र त्यांची कमी झालेली नव्हती आणि म्हणून त्यांनी आता तिसरा व्यवसाय करायचं ठरवलं. पण हा व्यवसाय करताना मात्र आता ताक देखील फुंकून प्यायचं ही भूमिका त्यांनी घेतली. नेमका कुठला व्यवसाय सुरू करायचा यावर त्यांनी जवळजवळ दीड वर्ष विचार केला. त्यावरती फार मोठा रिसर्च केला. त्याचे फायदे तोटे सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि मगच ऑनलाइन दूध व किराणा माल घरपोच पोचविण्याच्या सुविधा देणाऱ्या कंपनीची सुरुवात करायची असं त्यांनी ठरवलं. आणि २०१५ मध्ये मिल्क बास्केट या नावाने त्यांनी आपले ऑनलाइन ग्रोसरी स्टोअर सुरू केले. या कंपनीमार्फत भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरपोच पहाटे चार वाजेपासून दूध व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू डिलिव्हरी करणे सुरू केला.
कंपनीचे नाव मिल्क बास्केट असंच का ठेवलं तरी यामागे एक मोठा विचार आहे. २०१५ मध्ये ही कंपनी सुरू करण्यापूर्वी इतरही कंपन्या अशाच प्रकारची सर्विस पुरवत होत्या मग यांच्या कंपनीचा नेमकं वेगळेपण काय असेल हा विचार करत असतांना त्यांना असे लक्षात आले. बाकी सर्व कंपन्या ह्या केवळ किराणा माल पुरवतात. दूध किंवा फळं व भाज्या पुरविणाऱ्या फार क्वचित कंपन्या आहेत. त्या हव्या तितक्या मोठ्या नाहीत. आणि ज्या कुठल्या कंपन्या किराणामाल घरपोच पोहोचवत होत्या त्या फारशा नफ्यात नव्हत्या हें ही त्यांना लक्षात आलं. याचं प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक किरणा मालामागे अतिशय कमी मार्जिन असतं. मग पुन्हा प्रश्न उभा राहिला की, आपल्या अवतीभोवती असलेले दूध किराण्याच्या दुकानांना कसे परवडते या सर्व गोष्टी विकणे?
दूध किंवा इतर गरजेच्या वस्तू यावर जरी मार्जिन कमी असलं तरी जवळ जवळ प्रत्येक दुकानदाराला ते आपल्या दुकानात ठेवावाच लागतो. कारण त्या निमित्ताने तुमच्याकडे ग्राहक चालत येत असतो आणि इतर वस्तू विकत घेत असतो. त्यात त्यांना प्रेरित केलं ते वृत्तपत्र विक्रेत्यांनी. वृत्तपत्र हे याची किंमत मुळातच कमी असते व ते विक्रेत्यांना मिळणारा मार्जिन अतिशय कमी असतं, मग ते तरीदेखील कसे नफ्यात व्यवसाय करत असतील? वृत्तपत्र विक्रेत्यांकडे त्यांची प्रस्थापित सप्लाय चेन असते. म्हणजे फॅक्टरीमध्ये वृत्तपत्र छापले यानंतर ते थेट ग्राहकापर्यंत कमीत कमी वेळेमध्ये अचूक पद्धतीने कसे पोहोचवता येईल याची एक विशिष्ट प्रणाली त्यांच्याकडे असते. आणि या प्रणालीच्या जोरावर अतिशय कमी किंमत असलेल्या वृत्तपत्रातून देखील मोठा नफा या कंपन्या काढत असतात.
म्हणजेच मिल्क बास्केटला जर दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर अशीच एक विशिष्ट सप्लाय चेन सिस्टम उभी करणे गरजेचे आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि वृत्तपत्र प्रमाणेच पहाटे चार ते सात या वेळेमध्ये आपली संपूर्ण डिलिव्हरी पूर्ण करायची जेणेकरून तुमच्या ग्राहकाचं कुठलंच काम अडायला नको व तो सदैव संतुष्ट राहिल.
इतर कुठल्याही कंपनी पेक्षा वेगळं म्हणजे मिल्क बास्केट वरून तुम्ही अगदी पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा किंवा दहा हजार रुपयांचा किराणामाल यापैकी काहीही मागवू शकता. कमीत कमी इतक्याच रुपयांची ऑर्डर तुम्ही केली तरच घरपोच सुविधा मिळेल अशी कुठल्याही प्रकारची अट मिल्क बास्केट कडून घातली जात नाही. अगदी पटकन खराब होणारे पदार्थ जसे दूध भाज्या फळे मासे व यासोबतच इतर सर्व किराणामाल गहू तांदूळ बाजरी डाळी या सगळ्या गोष्टी कंपनीद्वारे घरपोच पुरविल्या जातात.
१०० प्रॉडक्टपासून सुरुवात करून आज तब्बल दहा हजारहून अधिक प्रॉडक्ट पर्यंत ही कंपनी भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पुरवत आहे. दिल्ली, गुरगाव, गाजियाबाद, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुणे व इतर काही शहरांमध्ये तिने आपले पाय भक्कम रोवले आहेत.
सद्यस्थितीला मिल्क बास्केट हे दिवसाला ८० हजार लिटर हून अधिक दूध व एक लाख किलो हून अधिक फळे व भाज्यांची डिलिव्हरी करत आहे. जून दोन हजार वीस मध्ये साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक इन्फेक्शन पोइंट वेंचर्स कडून या कंपनीत करण्यात आली. या गुंतवणुकीच्या जोरावर कंपनीने प्रमुख पाच शहरांचे नजीक आपली मोठी वेअर हाऊस स्थापन केली आहेत.
ज्यामुळे सर्व किराणा मालाचा साठा मुबलक प्रमाणात ठेवणे व मागणीनुसार वेळेत पुरवणे शक्य होत आहे. शहरांमध्ये एरिया प्रमाणे डिलिव्हरी करणाऱ्या गाड्या व व्यक्ती हे नेमून ठेवले असून प्रत्येक डिलिव्हरी त्याचे दर त्याचे मिळणारे पैसे सर्व गोष्टी एका सॉफ्टवेअर मार्फत करता येऊ शकतात. आणखी एक मिळालेल्या मोठ्या गुंतवणुकी नंतर आज मिल्क बास्केटमध्ये एकूण दहा दशलक्ष डॉलर्स होऊन अधिकची गुंतवणूक झाली असून या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये की सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे.
मिल्कबस्केत ची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक इतर कंपन्यांनी देखील या क्षेत्रात प्रवेश केला असून त्यात जिओ मार्ट सारखे बडे खेळाडू देखील आहेत.
Covid-19 परिस्थिती मध्ये कंपनीने नवीन ग्राहकांची नोंदणी बंद केली होती. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की मिल्क बास्केट च्या माध्यमातून लोक मोठ्या प्रमाणात गरजेपेक्षा जास्त किराणामाल साठवून ठेवत आहेत. आणि त्यामुळे इतर ग्राहकांना तो माल पुरवणे कंपनीला शक्य होत नाही.
किंबहुना २०२० मधील लपवून काळात कंपनीने प्रत्येक मालाची प्रतिव्यक्ती किती माळ विकत घेता येईल यावर देखील निर्बंध घातले होते. पण ते अनलॉक सोबत शिथिल करण्यात आले आणि त्यानंतर नवीन ग्राहकांची नोंदणी देखील पूर्ववत करण्यात आली आहे. केवळ पाच वर्षांमध्ये कंपनी ही नफा नोंदवू लागली असून २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त नफा नोंदवला आहे. वाढत्या मागणीने सोबतच कंपनीचा आता इतर नवीन शहरांमध्ये आपला व्यवसाय विस्तार करण्याचा विचार नजीकच्या भविष्यात आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!