आंतरराष्ट्रीय कंपनी उबर किंवा भारतीय कंपनी ओला कॅब यांच्या तोडीचे भारतीय नव्हे नव्हे महाराष्ट्रीय मुळाची कंपनी स्थापन केली आहे अगदी मराठमोळ्या औरंगाबाद येथील सचिन काटे याने. भारतभरातील २५१ हून अधिक शहरांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केलेल्या या मराठमोळ्या स्टार्टअप क्लियर कार रेंटल बद्दल जाणून घेऊयात.
औरंगाबाद जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यात सचिन काटे चा जन्म झाला. घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यात गाव लहान असल्यामुळे केवळ चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय गावात होती. चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आता पुढे काय करावं हा मोठा प्रश्न सचिनच्या आई-वडिलांना समोर उभा होता परंतु आपण शिकलो नाही म्हणून काय झालं आपल्या मुलांना तर चांगलं शिक्षण द्यावं ह्या उद्देशाने सचिनच्या वडिलांनी त्यांच्या मित्राकडे परगावी सचिनला शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला.
शालेय शिक्षण आता परगावी सुरू झालं. शिक्षणाची सोय जरी झाली असली तरी आर्थिक विवंचनेतून सुटका झालेली नव्हतीच. म्हणून अगदी पाचवीत असल्यापासून सचिन ने पेपरची लाईन टाकायला सुरुवात केली. धातूंचे पैसे घ्यायचे त्यातून सचिनचा वर खर्च व शालेय पुस्तकांची किंमत एवढं मात्र सुटायचं. अकरावी मध्ये गेल्यानंतर सचिनला योगायोगाने एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये ऑफिस बॉय ची नोकरी मिळाली. पण मुळातच शिक्षणाकडे कल असल्याने आणि काहीतरी जिद्दीने करण्याची उमेद असल्याने सचिनने त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग शिकण्यास सुरुवात केली. अकरावी तुन बारावी मध्ये जातो तोच त्याचे इन्स्टिट्यूटमध्ये सचिन आता ऑफिस बॉय न राहता कम्प्युटर इंस्ट्रक्टर म्हणून कार्यरत झाला. यावरूनच आपण सचिनच्या जिद्द चिकाटी व मेहनतीचा अंदाज लावू शकतो.
आणि इथूनच त्याची कंप्यूटर प्रोग्रामिंग बद्दल गोडी अधिकच वाढत गेली. आणि यामुळेच त्याला आपल्या पुढील करिअरमध्ये नेमकं काय करायचं त्या वाटा क्लियर होत गेल्या. आता आपलं करिअर आपण कम्प्युटर प्रोग्रामिंग मधेच करावं असं सचिनने निश्चित केलं. आणि म्हणून बारावी सायन्स शिक्षण झाल्यानंतर त्याने बीएस्सी कम्प्युटर सायन्स या कोर्ससाठी प्रवेश औरंगाबाद शहरात घेतला.
शिक्षण चांगला मिळू लागला पण म्हणून आर्थिक बाजू लगेच सुधारते असं होत नाही आणि म्हणून आपली पदवी संपादन करत असताना त्याला पार्ट टाइम जॉब स्वीकारावाच लागला. औरंगाबाद मध्ये जे का ट्रॅव्हल एजंट कंपनीमध्ये त्याला पार्ट टाईम जॉब मिळाला. आणि हाच पार्ट टाइम जॉब त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. ट्रॅव्हल कंपनी मध्ये काम करत असताना या व्यवसायातील अनेक पैलू त्याला समजू लागले. त्यातच आपल्या कॉम्प्युटर क्षेत्रात विज्ञानाचा त्याने या कंपनीसाठी फायदा करून देण्यास सुरुवात केली. त्या कंपनीसाठी सचिन ने स्वतःहून अनेक नवनवे सॉफ्टवेअर्स तयार करून दिले. यामुळे कंपनीचे काम अधिकाधिक सोपे होत होतं. यासोबतच कुठलीही कंपनी साठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्केटिंग, आणि या कंपनीसाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे गूगल वरती कुणीही ट्रॅव्हल्स संबंधित माहिती शोधली तर याच कंपनीची माहिती पहिल्यांदा दिसून येईल अशी व्यवस्था सचिन ने करून दिली. यामुळे त्या कंपनीचे मालक देखील सचिनवर खुश होते.
पण ह्या सर्व गोष्टी करत असताना सचिनचा ट्रॅव्हल व्यवसायातील अभ्यास हा अधिकाधिक गाढा होत होता. ट्रॅव्हल्स क्षेत्रात कुठल्या संधी उपलब्ध आहेत कुठल्या सुविधा हा कोण पुरवत आहे व कुठल्या सुविधांची उपलब्धता नाहीये अशा सगळ्याच गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यास सचिन ने सुरुवात केली होती.
हे सर्व काम सुरू असतानाच सचिनची बीएस्सी कम्प्युटर सायन्स मधील पदवी पूर्ण झाली. आणि त्यांना नोकरीसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शिक्षणाच्या जोरावर इतर शहरांमध्ये त्याला नोकरी मिळत देखील होती परंतु हा निर्णय त्याच्या घरच्यांना फारसा पटणारा नव्हता. आणि म्हणून त्याने औरंगाबाद मध्येच राहून काही तरी करण्याचा निर्णय घेतला. आपल्याच शहरात राहून ट्रॅव्हल्स क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्याने स्वतः काही सॉफ्टवेअर्स तयार केले ज्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायामध्ये फार फायदा होत होता व हे सॉफ्टवेअर त्याने चांगल्या किंमतीला विकले देखील. ट्रॅव्हल्स आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात सचिनने तब्बल सहाशे सॉफ्टवेअर्स तयार करून विकले आहेत.
इतक्या वर्षाचा ट्रॅव्हल्स मधील अनुभव वस प्रत्यक्ष स्वतः सॉफ्टवेअर बनवत असताना शिकलेल्या अनेक गोष्टी यातून त्याच्या असं लक्षात आलं की पर्यटन क्षेत्रामध्ये रेल्वे विमान बसेस हॉटेल्स ट्रॅव्हल पॅकेजेस या सर्व गोष्टींचा ऑनलाईन बुकींग तुम्ही सहज रित्या करू शकता मात्र जेव्हा वेळ येते एअरपोर्ट ते घर किंवा घर ते रेल्वे स्टेशन किंवा शहरांतर्गत रोड मार्गाने प्रवास करण्याची त्या वेळेला मात्र अशी कुठलीही सोयीस्कर सेवा उपलब्ध नाही. आणि हीच गॅप लक्षात घेता त्याने यावरच आपला व्यवसाय निर्माण करण्याचा विचार केला.
स्वतः सॉफ्टवेअर तज्ञ असल्याने त्याने टॅक्सी बुकिंग करण्याची एक वेबसाईट व अँप निर्माण केले. या ॲप्स सुरुवातीला टेस्टिंग त्याने केवळ औरंगाबाद शहरामध्ये केलं. इतर सर्व प्रवास जरी तुमचा चांगला झाला तरी तुमचा रोडचा प्रवास हा क्लियर व्हावा या उद्देशाने त्याने क्लियर कार रेंटल असे आपल्या कंपनीचे नाव ठेवले. जुलै 2010 मध्ये त्यांचीही क्लियर कार रेंटल कंपनी अधिकृतरित्या रजिस्टर झाली.
सुरवातीला त्याने औरंगाबाद मधीलच एका टॅक्सी प्रवास करणाऱ्या ग्रुप सोबत बोलणी केली. आणि प्रत्येक राइड मागे काही टक्केवारी ठरवून त्याने त्या सर्व टॅक्सी आपल्या ॲप वर उपलब्ध करून दिल्या. औरंगाबाद शहरामध्ये हळूहळू अशी प्रसिद्धी होत होती तसा क्लियर कार रेंटल या कंपनीला मिळणारा प्रतिसाद देखील वाढत होता. सुरुवातीला एक दीड वर्ष औरंगाबाद मध्येच आपले पाय घट्ट रोल यानंतर सचिनने आता विस्तार करण्याचा निर्णय घेतला. एव्हाना मोठ्या शहरांमध्ये उबर मेरू सारख्या कॅबस प्रस्थापित झालेल्या होत्या. यांना द्वितीय व तृतीय श्रेणी मधील शहरांमध्ये येण्यास अजून फार आवकाश लागेल हे सचिनने ताडलं. आणि म्हणून केवळ टियर टू टियर टू आणि थ्री शहरांमध्येच आपली सेवा पुरवायची असं सचिनने निश्चित केलं.
आणि म्हणता म्हणता अधिकाधिक मेहनत करून सचिन नी एका शहरातून दुसऱ्या आणि दुसर्यातून तिसऱ्या कडे वाटचाल केली आणि आज तब्बल 251 हून अधिक शहरांमध्ये क्लियर कार रेंटल चा बोलबाला आहे. मोठ्या शहरांमध्ये न जाता कुठल्याही प्रकारच्या मेट्रो सिटी मध्ये काम न करता देखील केवळ मध्यम शहरां मध्ये काम करत आज सचिन चा व्यापार भारतभर पसरला आहे.
केवळ एकट्याने सुरू केलेला हा व्यवसाय आज शंभर कर्मचाऱ्यांचा झाला आहे. भारता घरांमध्ये 14000 हून अधिक टॅक्सी या नावाने फिरत असून त्यांचे एक हजारहून अधिक कॉन्ट्रॅक्टर क्लिअर कार रेंटल सोबत जोडले गेले आहेत.
सचिनच्या मते हे सर्व श्रेय त्याच्या टीमचा आहे. इतर बड्या कंपन्या पेक्षा वेगळा सचिन कडे काय आहे यावर सचिन म्हणतो सर्वप्रथम माझ्याकडे उत्तम गुणवत्ता असलेले सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले सॉफ्टवेअर इंजिनियर हे केवळ मर्यादित काम करतात चाकोरीबद्ध क्षेत्रातच त्यांचं काम असतं आणि त्यामुळे कंपनी बद्दलची बांधिलकी तितक्या मोठ्या प्रमाणात उभे राहत नाही. परंतु माझ्या कंपनीमध्ये मी औरंगाबादला आहे काम करण्यासाठी केवळ औरंगाबाद शहरातीलच मुलं घेतो आणि त्यांना आपल्या शहरातील आपली कंपनी मोठी करायची आहे हे स्वप्न दाखवूनच ते काम यशस्वी होत असतं. टॅलेंट हा केवळ मोठ्या शहरांमध्येच नसून तो आज खेडोपाडी देखील आहे व त्याचा योग्य तो उपयोग आपल्याला करता आला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो हा विश्वास सगळ्यांना पटवून दिला जातो.
अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स जे आज सचिन सोबत जोडले गेले आहेत ते पूर्वी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी करत होते. पण या सर्वांना औरंगाबाद गडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी सचिन ने काही वर्षांपूर्वी एक ब्लॉग लिहिला होता “औरंगाबाद कॉलिंग”. आणि या ब्लॉगच्या परिणामस्वरूप सचिन कडे अनेक उत्तम गुणवत्ता धारक इंजिनियर्स की जे मुळचे औरंगाबादचे होते त्यांचे अर्ज आले. सचिन ने सगळ्यात जास्त परिश्रम आपली टीम सांभाळण्या वर घेतले आहेत आणि त्याचे फळही त्याला तसेच मिळत आहे.
एका सामान्य खेड्यातून आलेल्या मराठमोळ्या तरुणाला की जो एकेकाळी पेपर लाईन टाकण्याचे काम करत असे आज कोट्यवधींच्या व्यवसायाचा तो मालक आहे. आणि विशेष म्हणजे अकरा वर्षे जुन्या या कंपनीला आजवर कुठलेही बाहेरचे फंडिंग प्राप्त झालेले नाही, तरीही कंपनीत केवळ स्वबळावर इतकी मोठी झाली आहे आणि आज कोट्यवधींचा व्यवसाय दर महिन्याला करत आहे. आणि याच जोरावर आज हजारो ड्रायव्हर्स व शेकडो इंजिनिअर्सना नोकरी देखील देत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!