सोमवार, नोव्हेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भंडारदरा आणि आंबोलीत पावसाळी पर्यटनाला जायचंय? तातडीने येथे संपर्क साधा

ऑगस्ट 12, 2023 | 11:42 am
in संमिश्र वार्ता
0
waterfall


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाऊस पडल्यानंतर पावसाची अनेकविध रुपे पाहण्यासाठी, पावसाळी पर्यटनाचा आनंद व उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्यावतीने १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे ‘वर्षा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यटनप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.

पर्यटन मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, पर्यटकांनी आणि पावसाच्या थेंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे. या महोत्सवात पावसाचे मंतरलेले पाच दिवस अनुभवलेच पाहिजेत. १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या वर्षा महोत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, वैभवशाली परंपरा आणि आदिवासी बांधवांचे दुर्लक्षित राहिलेले कलागुण. त्याचबरोबर खाद्य परंपरा, दुर्ग आणि किल्ले, येथील जैव विविधता अशा अनेक गोष्टींना व्यासपीठ देणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने भंडारदरा व आंबोली पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेतानाच, महाराष्ट्रातल्या कला वैभवाची पर्वणी पाहता येणार आहे.

भंडारदरा येथील माहिती व नाव नोंदणीसाठी ९५९४१५०२४३ , ९९२१६६४००९ या क्रमांकावर संपर्क साधा. आंबोली येथे नाव नोंदणीसाठी ९३७१७३९६६६, ९४२०२०७०५५ या क्रमांकावर संपर्क साधा. अधिक माहितीसाठी https://t.co/vNy2LKG1Hc या संकेतस्थळास भेट द्या. @maha_tourism pic.twitter.com/KFjwkdea2u

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 11, 2023

पर्यटन संचालनालयाचे पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, स्थानिक पर्यटन वाढीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आवर्जून पहावी अशी ठिकाणे अंब्रेला फॉल्स, विल्सन धरण, कळसूबाई शिखर, रंधा धबधबा, रतनवाडी गाव, अगस्त ऋषींचा आश्रम, रतनगड किल्ला, अमृतेश्वर मंदिर, रिव्हर्स वॉटर फॉल, कोकणकडा, उंबरदरा खिंड, कुलंग खिंड, मदनगड अलंगड, पांजरेबेटे, कोलटेंभे फॉल, नेकलेस फॉल, सांदनदरी ही आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत आंबोली, माधवगड पॉईंट, तारकर्ली समुद्रकिनारा, धामापूर तलाव, शिरगावकर पॉईंट, नांगरतास धबधबा ही ठिकाणे पाहता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, १५ वा मजला, नरिमन भवन, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी चॅटबोट ९४०३८७८८६४ वर हाय पाठवा, अहमदनगरच्या माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१-९५९४१५०२४३ , ९१-९९२१६६४००९ वर तर सिंधुदुर्ग येथे नाव नोंदणीसाठी ९३७१७३९६६६, ९४२०२०७०५५ वर संपर्क साधा तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

पावसाळी पर्यटनाचा आनंद व उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या वतीने १२ ते १६ ऑगस्टदरम्यान भंडारदरा (जि. अहमदनगर) आणि आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित वर्षा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन पर्यटनमंत्री @girishdmahajan यांनी केले आहे. pic.twitter.com/cde0X895bR

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 11, 2023


bhandardara amboli varsha mahotsav Rainy Tourism Festival
Varsha Mahotsav’ from 12th to 16th August in Bhandardara and Amboli
Ahmednagar Sindhudurg Girish Mahajan

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिक्षक आमदारच आंदोलनाच्या पवित्र्यात… शिक्षण आयुक्तालयासमोर आमरण उपोषण

Next Post

दिंडोरीत खुन का बदला खुन… उघड झाला हा धक्कादायक प्रकार… २१ जणांवर गुन्हे दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

दिंडोरीत खुन का बदला खुन... उघड झाला हा धक्कादायक प्रकार... २१ जणांवर गुन्हे दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011