मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – कारागृहातील कैद्यांसाठी भजन स्पर्धा; आशिया खंडातील पहिला उपक्रम

by India Darpan
मे 15, 2022 | 5:05 pm
in स्थानिक बातम्या
0
nashik central jail

 

नाशिक- राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २० मे ते ३० जून या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचं निमित्त साधून कारागृहातील बंदिजनांसाठी आयोजित या स्पर्धेत २७ संघ सहभागी होणार आहेत. गृह विभागाने एका अध्यादेशाद्वारे कारागृहातील बंदिजनांसाठी ही स्पर्धा घेण्यास परवानगी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि तुरुंग महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, बापूसाहेब मोरे-देहूकर, डॉ. रामचंद्र देखणे, नितीन महाराज मोरे आणि योगेश देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.

बंदिजनांसाठी आयोजित केलेली ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव आणि पहिलीच स्पर्धा असल्याचं प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदिजनांना ह.भ. प.संदीप महाराज रायते व संगीत शिक्षक आनंद अत्रे प्रशिक्षण देत आहेत. या स्पर्धेचे नियोजन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा.किरण सानप व उपाध्यक्ष प्रज्ञा तोरसकर हे पाहत आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ संघांना दीना आणि प्रकाश धारिवाल यांच्या वतीने संवादिनी, तबला, पखवाज, दहा जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची फ्रेम आणि प्रेरणायादी शंभर पुस्तकांचा संच देण्यात येणार आहे.

सकारात्मक विचार वाढीस लागेल
बंदिजनांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार वाढीस लागून त्यांच्या आयुष्यात बदल व्हावा.जेणेकरून बाहेर पडल्यावर एक चांगला माणूस म्हणून त्यांना जगता येईल. यासाठी कारागृहांत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्रा.किरण सानप

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवळाली कॅम्प येथे एअरफोर्समध्ये कमांडींग ऑफीसरच्या वेटींग रुममध्ये लिपिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Next Post

अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात झाले हे महत्त्वाचे ठराव

India Darpan

Next Post
IMG 20220515 WA0009

अखिल भारतीय विद्युत मजदूर संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात झाले हे महत्त्वाचे ठराव

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011