नाशिक – दस-यानंतर सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहे. या दिवाळी निमित्त आता सर्वांमध्ये उत्साह सुध्दा संचारला आहे. लॅाकडाऊननंतर सर्व सुरळीत सुरु झाले आहे. अशातच भगूर येथील शिक्षण मंडळ संचालित नूतन विद्यामंदिर येथे शनिवारी आकाश कंदील कार्यशाळा संपन्न झाली.या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेचे कार्यवाहक मधुसूदन गायकवाड व कवडे सर शिक्षक संदीप गायकवाड व विशाल शिरसाठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे ही कार्यशाळा पर्यावरण पर्यावरण पूरक होती. कागदापासून बनवलेल्या आकाश कंदील मुलांना बनवण्यासाठी प्रोत्याहन देण्यात आले. या कार्यशाळेत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना श्री दत्त पेट्रोलियम संचालक सौ विद्या बापू वावरे, सचिन हांडोरे यांच्या तर्फे काचेचा आकाश कंदील भेट देण्यात आला.
नाशिकरोड – देवळाली कॅम्पला जोडणा-या लॅम रोडवर असलेल्या दत्त पेट्रोलियमच्या संचालक बापू वावरे व सौ विद्या वावरे हे नेहमी विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेत असतात. यावेळेस त्यांनी भगूरच्या या उपक्रमाला काचेचा आकाश कंदील भेट देऊन आपला सहभाग नोंदवला.तब्बल २८ विविध व्यवसाय व २४ पेट्रोलपंपांचे अकाउंटचे काम केल्यानंतर बापू वावरे हे पेट्रोलपंपाचे मालक झाले. पण, त्यांचे सामाजिक उपक्रम मात्र काही थांबले नाही. याअगोदर त्यांनी तब्बल ३६५ दिवस विविध कार्यक्रम घेतले आहे. आता त्यांनी नवीन उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. त्यांच्या पत्नी विद्या वावरे यांनी सुध्दा त्यात उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.