भगूर – भगूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या आजाराचे शेकडो रुग्ण आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ‘आरोग्यम् धनसंपदा अभियान ‘राबविण्यात आले यामध्ये १५० अधिक नागरीकांनी सहभाग नोदंविला. येथील राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आपल्या झेप भरारी फाऊंडेशनच्या माध्यमातून बलकवडे कोव्हीड सेंटरच्या प्रांगणात या उपक्रमाचे आयोजन आयोजन केले. यामध्ये गंगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने डॉ.भूषण देशमुख यांसह नितीन पुलेकर यांनी नागरिकांची हाडाची तपासणी व उपचार केले. झेप फाऊंडेशनतर्फे मोफत डेग्यू तपासणी करण्यात आली. भगूर शहरात घरोघरी लोक डेंग्यू चिकनगुनिया नंतर होणाऱ्या अंग व हाडे दुखीमुळे हैराण आहेत. गावात होमिओपॅथी डॅाक्टरांकडून ॲलोपथी औषधे घेऊन त्रासात काही फार फरक पडत नाही. अशावेळी लोकांना तज्ञ डॅाक्टरांकडून योग्य उपचार मिळणे गरजेचे आहे. या साठी आरोग्य धनसंपदा आभियानाच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची कळजी घेणार असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.
डेंग्यू तपासणीसाठी भगूर नगर पालिकेचे आरोग्य सेवक शरीफ शेख, योगिता कदम, जयश्री गायकवाड,वंदना गरुड,वैजयंती कटारे,सुप्रिया कदम, जयश्री गायकवाड तर मॅग्मो एनजीओ व समर्पण फाऊंडेशच्या माध्यमातून सीबीसी टेस्ट, किडनी क्रिएटिन फंक्शन टेस्ट, कॉलेस्टोल, कॅल्शियम, युरिक ऍसिड, थायरॉईड, पोटॅशियम, प्रोटीन कावीळ,एचआयव्ही, बिलीरुबीन, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणीसह कोविडच्या आरटीपीसीआर व अँटीजेन तपासण्या मोफत करण्यात आल्या याकरीता विलास बोडके, प्रतीक्षा खत्री, ज्योती भोर आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी डॉ.कृष्णा बाविस्कर, विशाल बलकवडे, डॅा गावीत, डॅा राहूल भालेराव, सुनिता भालेराव, महेंद्र काळे, प्रेमलता राजगुरू, कैलास भोर, निलेश गोरे आदी उपस्थित होते.