मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील टोकडे गावातील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेला भगवान फरस या दुग्ध व्यवसायिकांने स्वातंत्र्य दिनानिमित्त बाईकला तिरंगा झेंडा बांधून चालत्या बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करीत तिरंगा ध्वजाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.
त्यांच्या स्टंटचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहे. दररोज २० किलोमीटर बाईकवरून दूध वाहतूक करतांना हात सोडून बाईक चलावता चालवता चित्रपटात स्टंटमॅन म्हणून काम मिळेल या पॅशनमधून त्याने बाईकवरील स्टंट करायला सुरवात केली. भगतसिंग १८ प्रकारचे स्टंट लीलया करतो. त्याचे अनेक स्टंट व्हायरल होत आहे. तसे स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र मालेगाव परिसरात भगतसिंगच्या स्टंटची चर्चा आहे. माझ्यासारखे स्टंट इतरांनी करू नये असा संदेशही भगतसिंग देत असतो.