बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट फेल…बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक रावच्या पॅनलला १४ जागा तर महायुतीला इतक्या जागा

ऑगस्ट 20, 2025 | 7:53 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील बेस्टच्या पतपेढीसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यानंतर या निवडणुकीत लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. पण, या निवडणुकीत ही टेस्ट फेल झाली. या निवडणुकीत ठाकरे गटाने २१ पैकी १९ तर मनसे २ जागा उत्कर्ष पॅनलतर्फे लढवल्या पण, यातील एकही जागा या पॅनलला जिंकता आली नाही. तर दुसरीकडे फारश्या चर्चेत नसलेल्या शशांक राव यांच्या पॅनलने १४ जागा जिंकत पतसंस्थेवर वर्चस्व मिळवले. तर महायुतीच्या सहकार पॅनलला ७ जागा मिळाल्या. त्यात प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, निलेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदे सेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचा समावेश आहे. तर एक जागा एससीएसएटी युनियनला मिळाली आहे. १८ ऑगस्टला मतदान झाले त्यानंतर मंगळवारी १९ तारखेला मतमोजणीला सुरुवात झाल्यानतंर आता अंतिम निकाल हाती आला आहे.

९ वर्षे या पतसंस्थेवर सत्ता असणा-या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. एेन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेची या निवडणुकीत एन्ट्री झाली. त्यामुळे हे पॅनल मतदानाच्या अगोदरच अडचणीत सापडले होते. एकीकडे ठाकरे बंधु व दुसरीकडे महायुतीचे तगडे पॅनल असतांना शशांक राव यांनी या निवडणुकीत २१ उमेदवार उतरवले होते. त्यापैकी १४ संचालक त्यांचे निवडून आले. त्यामुळे दोन्ही आघाड्यांना हा मोठा धक्का समजला जातो. पण, ठाकरे बंधुला एकही जागा जिंकता न आल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक धक्कादायक ठरली आहे.

गेल्या चार वर्षापासून ही निवडणूक रखडली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर या दोन्ही ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट असल्याचे बोलले जात होते. पण, या टेस्टमध्ये ठाकरे बंधुचे पॅनल फेल ठरले. या निवडणुकीत शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती झाली. त्यांनी प्रणि उत्कर्ष पॅनल तयार करुन त्यांच्या पोस्टरवर ठाकरे ब्रॅण्ड असे लिहले होते. तर दुसरीकडे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कर्ष सभा, निलेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेच्या किरण पावसरकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृध्दी पॅनल निवडणुकीत उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्सं युनियन पुरस्कृत शशांक राव पॅनल यांनी २१ उमेदवार रिंगणात उतरवले होते.
दी बेस्ट एम्प्लॅाईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निकाल
शशांक राव पॅनल -१४
महायुती पॅनल सहकार पॅनल – ६ (भाजप ४, शिंदे गट २)
मनसे – शिवसेना उत्कर्ष पॅनल -०

एससी- एसटी युनियन – १

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती…हे झाले १० सामंजस्य करार

Next Post

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
rekha gupta 1

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011