विशेष प्रतिनिधी, मुंबई
आजच्या काळामध्ये प्रत्येकालाच आपली स्वतःची कार असावी असे वाटणे साहजिक आहे, कारण कोरोनामुळे सार्वजनिक वाहनातील गर्दीचा संपर्क कोणालाही नको असतो. त्यातच गाडीचे रंगरूप आकर्षक असावे तसेच अॅव्हरेज देखील चांगले मिळावे, अशी देखील अपेक्षा असते. अशा प्रकारच्या काही गाड्या बाजारात दाखल झाल्या असून ग्राहकांच्या त्याकडे कल वाढला आहे.
सध्या वाहन खरेदीसाठी आपला सेगमेंट तयार केला असून सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही देशातील अनेक लोकांना आवडत आहे. तर काही लोकांना अॅव्हरेज आहेत. यात काही शंका नाही की हॅचबॅक वाहने सर्व वयोगटातील लोकांना आवडतात आणि त्यांची किंमत बजेटमध्ये सहजपणे बसते. फक्त 5 लाखात आपण खरेदी करू शकता अशा काही वाहनांबद्दल जाणून घेऊ या…
