सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तुम्ही जर 5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल आणि तुमचे बजेट जर २० हजार रुपयांपर्यंत असेल तर तुमच्यासाठी काही उत्तम पर्याय आहेत. स्वतःसाठी उत्कृष्ट मोबाइल फोन निवडणे कदाचित आव्हानात्मक असेल. फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमतीत वार्षिक वाढ झाल्यामुळे, मध्यम श्रेणी आणि प्रीमियम मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. Realme, Redmi, Samsung आणि Poco सारख्या सेलफोन कंपनी त्यांचे 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. आता आपण २० हजारांपेक्षा कमी किंमतीचे उत्तम 5G स्मार्टफोन कोणते ते पाहूया..
Samsung Galaxy M42
या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G SoC प्रोसेसर आणि क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित One UI 3.1 वर चालतो. यात 6.6-इंचाचा HD+ सुपर AMOLED Infinity U डिस्प्ले आणि Qualcomm Snapdragon 750G SoC प्रोसेसर आहे. फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये आहे.
Redmi Note 10T
Redmi Note 10T स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी, फास्ट चार्जर, 90hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. यात 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2400×1080 आहे, जो एक डॉट डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेशरेट 90Hz आहे. हा डिवाइस MediaTek Dimensity 700 चिपसेट सह येतो. यात 6 GB रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. Redmi Note 10T ची किंमत 16,999 रुपये आहे.
Poco M3 Pro
Poco M3 Pro 5G स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये आहे. या किंमतीत 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. याशिवाय, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. Poco M3 Pro मध्ये 6.5-इंचाचा FullHD+ LCD डॉट डिस्प्ले आहे. तसेच, यात 90hz चा रिफ्रेशरेट आहे, जो डायनॅमिक स्विचसह येतो. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 12 वर काम करतो. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरीसह येतो, जो 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
Realme 8 5G
Realme 8 5G ची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे, जी 4GB रॅम आणि +128GB इंटरनल स्टोरेज ऑफर करते. तसेच, या फोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. तसेच डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. जर आपण बॅटरी पॉवरबद्दल बोललो तर यात 5000 mAh बॅटरी आणि 18 वॉट क्विक चार्जर आहे. तसेच, हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 16999 रुपये आहे. Realme 8 5G फोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर काम करतो.