इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रद्धा कपूरच्या भावाला बंगळुरू येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धांत कपूर याच्यावर अमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी छापेमारीनंतर त्याला ताब्यात घेतले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अमली पदार्थाचे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये अनेक सेलिब्रिटिंचे नाव समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या दुसऱ्या पुण्यतिथीपूर्वी पुन्हा एकदा अमली पदार्थाच्या प्रकरणाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत कपूर याला अमली पदार्थ सेवन केल्या प्रकरणी बंगळुरू येथे ताब्यात घेतले आहे. सिद्धांत कपूर याच्यासह ६ जणांची अमली पदार्थ सेवन केल्याची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. सर्व संशयित आरोपी बंगळुरू येथील एमजी रोड येथील एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते. यादरम्यान पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली.
पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करत पार्टी सुरू असलेल्या हॉटेलवर छापेमारी केली. यादरम्यान पोलिसांनी नशेच्या औषधांचे सेवन केल्याच्या संशयावरून उपस्थितांचे नमुने पाठविले. चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये सिद्धांत कपूरच्या नमुन्याचाही समावेश होता. त्यांनी हॉटेलमध्ये येऊन नशेच्या औषधांचे सेवन केले आहे की नाही याबद्दल अद्याप अस्पष्टता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, सिद्धांत कपूरने अमली पदार्थ सेवन केल्याने त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर वडील शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया आली आहे. मी फक्त एवढेच सांगू शकतो की हे अशक्य आहे. अशी प्रतिक्रिया शक्ती कपूरने एका संकेतस्थळाशी बोलताना दिली आहे. २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकरण चांगलेच तापले होते. यामध्ये अनेक कलाकारांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी अमली पदार्थविरोधी संस्थेने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) श्रद्धा कपूरचीही चौकशी केली होती. परंतु त्या प्रकरणात कोणताच आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
https://twitter.com/ANI/status/1536194380935368705?s=20&t=fbZK8-7FC2N39TDguKs6HA