इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बंगळुरू ते म्हैसूरचा प्रवास आता खुपच कमी वेळेचा होणार आहे. तब्बल ३ तासांचा हा प्रवास आता अवघ्या ७५ मिनिटांमध्येच पूर्ण होणार आहे. ११८ किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक एक्स्प्रेस वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा एक्सप्रेस वे बनवण्यासाठी सुमारे 8,480 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस वे दोन टप्प्यात बांधण्यात आला आहे. यापैकी 52 किमी लांबीचे पाच ग्रीनफील्ड बायपास आहेत. 7 किमी लांबीचा श्रीरंगपट्टणा बायपास, 10 किमी लांबीचा मांड्या बायपास, 7 किमी लांबीचा बिदाडी बायपास, 22 किमी लांबीचा रामनगरम आणि चन्नापटना बायपास आणि 7 किमी लांबीचा मद्दूर बायपास यांचा त्यात समावेश आहे.
या एक्स्प्रेस वेमुळे या प्रदेशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यटन विकासालाही मोठी गती मिळणार आहे. वाहतुकीमुळे होणारी कोंडीही बऱ्याच अंशी कमी होणार आहे. सध्या दोन शहरांमधील प्रवास पूर्ण करण्यासाठी 3 तास लागतात. या प्रकल्पांतर्गत, NH-275 चा बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभाग सहा पदरी केला जात आहे.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1634710186211385346?s=20
पंतप्रधानांनीही ट्विट करून या एक्स्प्रेस वेचे कौतुक केले होते. एक्स्प्रेस वेमुळे कर्नाटकच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे ते म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले ट्विट शेअर करत पीएम मोदींनी लिहिले की, हा एक महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे.
या एक्सप्रेस वेमध्ये ४ रेल्वे ओव्हरब्रिज, ९ महत्त्वाचे पूल, ४० छोटे पूल आणि 89 अंडरपास आणि ओव्हरपास यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर त्यात राष्ट्रीय महामार्ग-२७५ चा एक भागही समाविष्ट आहे. हा प्रकल्प कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि श्रीरंगपटना, कूर्ग, उटी आणि केरळ सारख्या भागात पोहोचण्यासाठी काम करेल.
दरम्यान, गेल्या महिन्यात पंतप्रधानांनी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा दिल्ली-दौसा-लालसोट विभाग राष्ट्राला समर्पित केला होता. यामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा वेळ ५ तासांवरून ३.५ तासांवर आला आहे.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1634577660444651520?s=20
#nitingadkari #PMModi #Bengaluru_Mysuru_Highway #PragatiKaHighway
Bengaluru Mysuru Express way will open from 12 March 2023