इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सायबर सिटी म्हणून परिचित असलेल्या एका धक्कादाय घटनेने खळबळ उडाली आहे..एका टेक फर्मच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतांची नावे फणींद्र सुब्रमण्यम ( एमडी ) आणि वीनू कुमार ( सीईओ) अशी झाली आहे. दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीचे नाव फेलिक्स तो एरोनिक्सचा माजी कर्मचारी होता, असे म्हटले जात आहे.
…म्हणून तो संतापला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक माजी कर्मचाऱ्याने नामांकित अशा टेक कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये शिरून तलवारीने हल्ला करत दोघांचीही हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपीचे नाव फेलिक्स असल्याचे सांगण्यात येत आहे. तो एरोनिक्सचा माजी कर्मचारी होता. प्राथमिक माहितीनुसार, फेलिक्सने कंपनी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्याच्या या व्यवसायात संबंधित दोघेही कथितपणे अडथळा आणत होते. यामुळे फेलिक्स संतापला होता. यामुळे त्याने रागाच्या भरात तलवार घेऊन कंपनीच्या कार्यालयात शिरला आणि फणींद्र तसेच वीनू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला. या हत्येतील आरोपी फेलिक्स टिक टॉक आणि रील्स व्हिडिओ बनविण्यासाठी माहीर आहे, असे समजते.
कर्मचारी हादरले
महत्वाचे म्हणजे फणींद्र आणि वीनू हे दोघेही कार्यालयात होते. फेलिक्सने फणींद्र आणि वीनू कुमार यांच्यावर अत्यंत सावध पणे संपूर्ण प्लॅनिंगसह हल्ला केला. सायंकाळी कार्यालय बंद होण्यास सुमारे एक दोन तासाचा कालावधी शिल्लक असताना संतापलेला फेलिक्स तलवार आणि चाकू घेऊन एरोनिक्सच्या कार्यालयात पोहोचला आणि त्याने या दोघांवर थेट हल्ला चढवला. यानंतर, फणींद्र आणि वीनू यांनी बचावाचा आणि तेथून पळ काढण्याचाही पूर्ण प्रयत्न केला. मात्र फेलिक्सने त्यांना घेरून संपवले. फेलिक्स कार्यालयात शिरताच सर्वच कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्येनंतर, पोलिसांना कॉल करण्यात आला होता. डीसीपी लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीनू कुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हल्लेखोर फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्वत्र चौकशी करत आहेत.