इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे स्वतःची कार असावी, असे अनेकांना वाटते. त्यातच हॅचबॅक प्रकारातील वाहनांना सध्या चांगली मागणी आहे. हॅचबॅक प्रकारातील कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. कारण हे वाहन किमतीत किफायतशीर आहेत, तसेच लहान कुटुंबासाठी योग्य पर्याय आहेत. आपल्याला नवीन कार घ्यायची असेल आणि बजेट थोडे कमी असेल तर 4 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या 3 कारबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मारुती सुझुकी अल्टो
ही कार दोन दशकांपासून भारतीय बाजारपेठेत आहे. कारची किंमत 3.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. मारुती सुझुकी अल्टो 0.8-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 47bhp आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. तसेच हे वाहन सीएनजी पर्यायात देखील येते. CNG सह कारचे मायलेज 31KM पेक्षा जास्त आहे. यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री आणि फ्रंट ड्युअल एअरबॅगसह दोन-टोन डॅशबोर्ड मिळतो.
मारुती सुझुकी एस-प्रेसो
या कारची किंमत 3.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हे वाहन 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे जे 67bhp/90Nm जनरेट करते. अल्टो प्रमाणे, हे CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 31KM पेक्षा जास्त मायलेज देते. वैशिष्ट्यांमध्ये सेंट्रली माउंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टुडिओसह टचस्क्रीन सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, यूएसबी आणि 12-व्होल्ट स्विचेस, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Datsun redi-GO
विशेष म्हणजे Datsun redi-GO हॅचबॅक किंमत 4.52 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यात 0.8 लीटर आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे वाहन 22 kmpl पर्यंत मायलेज देते. यात LED DRLs, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवीन ड्युअल-टोन 14-इंच व्हील कव्हर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कीलेस एंट्री यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.