मुंबई – दुचाकीच्या बाजारात एक लाखाच्या किंमतीचा टप्पा अनेक मोटरसायकलींनी ओलांडला आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. तुमचे बजेट एक लाखाच्या आत असेल आणि कमी किमतीत दुचाकीचा शोध घेत असाल तर आम्ही तुम्हाला अशा पाच दुचाकींबद्दल माहिती सांगणार आहोत ज्या परवडणाऱ्या दरात आहेच शिवाय पावरफूल आणि इंधनाची बचत करणार्या आहेत. या दुचाकींचे मायलेजही चांगले आहे. त्या कोणत्या दुचाकी आहेत हे जाणून घेऊयात.
बजाज पल्सर १५० नियॉन -९९,४१८ रुपये
बजाज पल्सर १५० ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. भारतातील ही पहिल्या क्रमांकाची स्पोर्ट्स बाइक आहे असा कंपनीचा दावा आहे. पल्सरच्या या मालिकेत १४९.५ सीसी सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. ती ८,५०० आरपीएम वर १३.८ बीएचपीची पावर आणि ६,५०० आरपीएमवर १३.२५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. बजार पल्सर नियॉनमध्ये १५ लिटरचे इंधनाचा टँक दिला आहे. सस्पेंशनबाबत सांगायचे झाले तर बाइकच्या समोर टेलिस्कॉपिक, ३१ एमएम कन्व्हेंशनल फॉर्क देण्यात आला आहे. या दुचाकीत समोर एबीएस, २६० एमएम डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
बजाज पल्सर एनएस १२५ – ९९,३४७
बजाज ऑटोची ही प्राथमिक स्तरावरील पल्सर एनएस मालिकेतील दुचाकी खूपच परवडणार्या किमतीत मिळते. या पल्सरला पल्सर एनएस २०० ची स्टायलिंग मिळते. पल्सर एनएस १२५ ही स्पोर्टी डिझाइनमध्ये मिळते. या दुचाकीत १२४.४५ सीसीचे सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. ते ८५०० आरपीएमवप ११.६ बीएचपीती पावर आणि ७००० आरपीएमवर ११ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये अँटी-स्किड ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे. बाइकमध्ये २४० एमएम फ्रंट पेटल डिस्क आणि १३० एमएम रिअर ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. दुचाकीत बीएसव्हीआय कंप्लायंट डीटीएस-आय ईआय इंजिन आहे. १२ लिटरचे इंधनाचा टँक आहे.
टीव्हीएस रायडर १२५ – ७७,५०० रुपये
नवी टीव्हीएस रायडर १२५ आपल्या सेगमेंटमधील प्रसिद्ध उत्पादनांपैकी एक आहे. टीव्हीएसची ही दुचाकी मॉडर्न डिझाइन आणि प्रीमियम फिचर्ससह मिळते. टीव्हीएस रायडर १२५ मध्ये एलइडी डीआरएल सह एलइडी हेडलाइट देण्यात आला आहे. दुचाकीत फुल्ल डिजिटल डिस्प्ले, आयडिअल स्टार्ट-स्टॉप सिस्टिम, दोन राइड्स मोड, अंडर-सीट स्टोअरेज स्पेस देण्यात आला आहे. कनेक्टेड व्हेरिएंटमध्ये टीव्हीएस Smart Connect Bluetooth मॉडेल आणि कलर टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. बाइकमध्ये १२४.८ सीसीचे सिंगल सिलिंडर, एअरकूल्ड इंजिन देण्यात आले आहे. दुचाकीचे इंजिन ७५०० आरपीएम वर ११.२ बीएचपीची पावर आणि ६००० आरपीएमवर ११.२ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.
होंडा एसपी १२५ – ७८,८१० रुपये
होंडामधील ही प्रीमियम कॉम्प्युटर दुचाकी आपल्या सेगमेंटमधील सर्वोत्तम दुचाकी आहे. होंडाची ही दुचाकी एलइडी हेडलाइट, फुल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि मॉडर्न स्विचगिअरसह उपलब्ध आहे. दुचाकीत १२४ सीसीचे सिंगल-सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. दुचाकीचे इंजिन ७५०० आरपीएम वर १०.७२ बीएचपीची पावर आणि ६००० आरपीएमवर १०.९ एनएमचा टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये ५ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
हिरो ग्लॅमर – ७५,९०० रुपये
हिरो मोटोकॉर्पची ग्लॅमर १२५ ही दुचाकी सर्वात परवडणार्या १२५ सीसी मोटरसायकलपैकी एक आहे. बाइकमध्ये १२४.७ सीसीचे सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. बाइकचे इंजिन ७५०० आरपीएमवर १०.७२ बीएचपीची पावर आणि ६००० आरपीएमवर १०.६ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. बाइकचे XTec मॉडेल एलइडी लायटिंग आणि ब्लूटूथ इनबिल्ड इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसह मिळते.
(खरेदीपूर्वी आपल्या स्थानिक शोरुम किंवा डिलरशी संपर्क करावा. शहरनिहाय किंमतीत बदल होऊ शकतो)