पाटणा, बिहार (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – विमान अपघात होणे अत्यंत दुर्दैवी घटना कारण यामधील प्रवास अंधारीत आकाशात असतो, त्यामुळे विमान अपघात झाल्यावर प्रवाशांचे जिव वाचण्याची खूपच कमी शक्यता असते. त्यामुळे विमान चालवणारा पायलटला अत्यंत सतर्क राहून अन्य कशाचाही विचार न करता विमान चालावे लागते. मात्र काही वेळा विमानामध्ये बिघाड होऊन अपघात होतातच, अशा अनेक दुर्घटना गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाप्रसंगी झाले आहेत. परंतु काही वेळा टेक ऑफ घेताना किंवा लॉडींग करतानादेखील अपघात होऊ शकतो. मात्र असे काही अपघात वैमानिक किंवा सहवैमानिक आणि विमानातील अन्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळलेले आहेत अशाच प्रकारची घटना बिहारमध्ये घडली परंतु वैमानिकाच्या सतर्कतेमुळे यातील प्रवाशांचा जीव वाचला. या विमानात 170 प्रवासी होते. बिहारची राजधानी पाटणा येथील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा विमान अपघात टळला.
पार्किंग बे वरून विमान धावपट्टीवर नेत असतानाच वैमानिकाला तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाली. त्यामुळे धावपट्टीवर धावण्याआधीच विमान पुन्हा पार्किंगच्या ठिकाणीत आणून पार्क करण्यात आले. यानंतर विमानातील बिघाड दूर केल्यानंतर ते बंगळुरूला परत पाठवण्यात आले. मात्र, विमान कंपनी याला किरकोळ दोष म्हणत असून ती दुरुस्त करून बंगळुरूला परत जाण्याबाबत सांगण्यात येत आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोएअरचे फ्लाइट G8 874 पाटणा विमानतळावरून बेंगळुरूला जाण्यासाठी 12.35 वाजता पार्किंग बेवरून धावपट्टीवर पोहोचले होते.
या विमानातील दोष आणि बिघाड वैमानिकाला समजले. त्यानंतर पायलटने तात्काळ याबाबत नियंत्रणा कक्षाला कळवले आणि परवानगी मिळताच ते पुन्हा खाडीत आणले. यावेळी प्रवाशांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत तक्रार करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी दुसरीकडे विमानतळावर असलेल्या अभियंत्यांच्या पथकाने हा दोष तातडीने दुरुस्त केला असून त्याचे निराकरण करण्यासाठी 45 मिनिटे लागली असे सांगीतले. यानंतर दुपारी 1.20 वाजता हे विमान बंगळुरूसाठी रवाना झाले.