नवी दिल्ली – एखाद्या वाहनाचे लॉन्चिंगपूर्वीच तब्बल १० लाख ग्राहकांनी बुकींग करावे, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल. पण, हे सत्य आहे. अमेरिकेची टेस्ला कंपनीच्या नशिबी हे यश आले आहे. या कंपनीचा सायबरट्रक सध्या जगभराकच विशेष चर्चेचा ठरत आहे. आणि त्यालाच अशी ही जोरदार मागणी आहे.
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. अशा वाहनांचा पुरवठा करण्यामध्ये अमेरिकेची कंपनी टेस्ला (Tesla) सर्वात पुढे आहे. टेस्ला कंपनीने जागतिक बाजारात आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक सायबरट्रकला (Cybertruck) नुकतेच लाँच केले आहे. या इलेक्ट्रिक पिक-अप ट्रकला या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या बाजारात लाँच केले जाणार आहे. परंतु लाँच होण्याआधीच १० लाख ट्रकची नोंदणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता या वाहनाच्या ड्रायव्हिंग रेंजवरून एक आश्चर्यचकित करणारा नवा खुलासा झाला आहे.










